लोकमत न्यूज नेटवर्कमनोर : मुंबई अहमदाबाद महामार्ग लगत वरई चोकी जवळ नाका बंदी मध्ये पोलिसांनी अवैध खैर वाहतूक करणारा टेम्पो पकडला. मात्र, चालक व त्याचा सहकारी अंधाराचा फायदा घेऊन जंगलामध्ये पळून गेले. मनोर पोलिसांनी पढील कारवाईसाठी खैरा सहित टेम्पो वनविभागा कडे दिला आहे. त्यात २३ ओंडकी असून त्याची अंदाजे किंमत दोन लाख आहे.सफाळे - वराई रस्त्या वरून पहाटे पाचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा टेम्पो वराई पोलीस चौकी जवळ सहा फौेजदार बी. जी. भांगरे, पोलीस चोधरी यांनी नाका बंदीमध्ये अडविला असता त्यामध्ये खैराची लाकडे आढळली. पोलिसांनी व्हॅन साईट ला लावण्यास सांगितले असता वाहन मागे घेत असताना चालक व त्याचा सहकारी टेम्पोतून उड्या टाकून जंगलात पळून गेले. पोलिसांनी पाठलाग केला मात्र ते अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. त्यानंतर घटना स्थळी पोलीस पंचनामा करून खैराच्या लाकडा सहित टेम्पो मनोर येथील वन विभागाचे अधिकारी वनपाल आर. डी. नाईक, एस. बी. राठोड, एस. खरे यांच्या ताब्यात दिला.
खैर हाती, तस्कर पळाले
By admin | Published: July 08, 2017 5:15 AM