- शौकत शेखडहाणू : डहाणूच्या किनारपट्टीवरील चाळीस ते पन्नास गावांपासून दिवस, रात्र वीजपूरवठा सातत्याने खंडीत होत आहे. परिणामी वीजेवर अवलंबुन असलेल्या झेरॉक्सची दुकाने, पिठाच्या गिरण्या, डायमेकर्स, लघुउद्योजक तसेच शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प होत असल्याने महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. या बाबत डहाणूतील राष्टÑवादी काँग्रेसने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील चिंचणी, वरोर, वानगांव, या फिडर अंतर्गत येणाऱ्या सुमारे चाळीस ते पन्नांस गावांत तसेच खेडोपाडयात महावितरणाचा भोंगळ कारभारा सुरु आहे. दिवस, रात्र वीजेचा खेळ खंडोबा सुरू असल्याने परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये व्यत्यय येत आहे. वरील गावांत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून महावितरणाचा वीजपूरवठा सुरळीत राहावा यासाठी कोणतीच ठोस उपायोजना न केल्यामुळे येथील ट्रान्सफार्म, जिर्ण व जुनाट झालेले वीजेची तारे, कंडक्टर, फ्यूस वारंवार बिघाड होऊन दररोज चार, पाच तास वीज पूरवठा खंडीत होणे नित्याची बाब झाली आहे.विशेष म्हणजे दर शुक्रवारी दुरूस्तीच्या नावाखाली डहाणू शहर, चिंचणी, वरोर, वानगांव, कासा भागांत आठ ते दहा तास वीजपूरवठा खंडीत केला जातो. नागरीकांनी वारंवार तक्रारी करुन सुद्धा कामकाजामध्ये कोणतीच सुधारणा होत नसल्याने राष्टÑवादीे तालुकाध्यक्ष राजेश पारेख तसेच काँग्रेसचे मोईन शेख यांनी दिला आहे.बोईसर येथील तांत्रिक बिघाडामुळे भारनियमनदिवसभर लोंबकळत असलेल्या वीजेच्या तारा कोणत्याही क्षणी कुठे ना कुठे तुटून पडत असल्याने सातत्याने वीजपूरवठा खंडीत होत आहे. त्याच्यात भर म्हणून गेल्या महिनाभरापासून बोईसर येथे सातत्याने तांत्रिक ािघाड होत असल्याने आपत्कालिन भारनियमन घेतले जात आहे.विशेष म्हणजे रात्री, बेरात्री बोईसर उपकेंद्रात बिघाड झाला की सात आठ तास वीजपूरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे लोकांचा काम धंदा, व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून लाखोचे नुकसान होत आहे. वीजेचे दुप्पट तिप्पट वीज बील भरणाºया नागरिकांना दिवसभर उकाडयात राहवे लागते.
डहाणूची पश्चिम किनारपट्टी दररोज चार ते पाच तास अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 1:50 AM