वसई : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला होळी- बेणापट्टी समुद्रकिनारी मंगळवारी रोजी दुपारी एकच्या सुमारास महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत भरतीच्या पाण्यासोबत वाहत आला. हा महाकाय व्हेल मासा सुमारे ४० ते ५० फूट लांबीचा आणि दहा टन वजनी असून तो सुमारे १५ ते २० दिवसांपूर्वीच समुद्रात एखाद्या मोठ्या बोटीच्या धडकेने अथवा समुद्रातील सुरूंग स्फोटाने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.बऱ्याच महिन्यांनी वसई समुद्रकिनारी असा महाकाय व्हेल मासा कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर या महाकाय व्हेल माशाला पाहण्यासाठी वसईकर स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. या व्हेल माशाची माहिती स्थानिक रहिवासी वेलकनी डिसोझा आणि पायस अंकल यांनी महापालिका प्रशासनाला दिली. या माशाची याच समुद्रकिनारी विल्हेवाट लावली जाईल, असे समजते.
बेणापट्टी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत आढळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 7:18 AM