शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

वसई विरार महापालिकेची अंतिम महासभेचा मुहूर्त कधी?; राज्यशासनाचे कायदे मीरा -भाईंदर महापालिकेला लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 3:47 PM

वसई विरार मध्ये अनिश्चिततेचे ढग कायम ?

-आशिष राणे,वसई

वसई : बहुचर्चित वसई विरार शहर  महापालिकेची पंचवार्षिक मुदत व त्यातील लोकप्रतिनिधीचा  कार्यकाळ येत्या दि.28 जून 2020 च्या रात्री संपुष्टात येत असून त्यानंतर तात्काळ येथे प्रशासकीय कारभार सुरु होणार आहे. 

दरम्यान अशी जरी परिस्थिती असली तरी कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर आजवर मार्च नंतर तीन महिन्यांपासून रखडलेली महापालिकेची अगदीं शेवटची महासभा पालिकेचा हा पाच वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी तरी होणार का किंबहुना यअंतिम महासभेला नेमका मुहूर्त कधी मिळेल असा देखील प्रश्न आता सत्ताधारी लोकप्रतिनिधी आपसात विचारु लागले असल्याचे चित्र वसई विरार मध्ये दिसत आहे.

एकूणच वसई विरार महापालिकेची लॉक डाऊन सुरू होण्यापूर्वी ची महासभा ही 16 मार्च ला झाली होती. त्यानंतर सर्वत्र टाळेबंदी मुळे पालिकेच्या सभा, महासभा इतर बैठका आदींना एकत्रित येण्यास राज्यशासनाने बंदी घातली होती. तरी देखील मधल्या काळात टाळेबंदी त थोडी फार शिथिलता आल्यावर लोकप्रतिनिधी व महापौर यांनी आयुक्तांच्या मागे सभेसाठी तगादा लावला होता तरी सभा कुठे घेणार किंवा सोशल डिस्टनसिंग बाबत विचार करून ठरवले जाईल असे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले होते,त्यामुळे यापूर्वी  मे अखेरीस महासभा होणार होती,परंतु आयुक्तांनी पुन्हा राज्य शासनाने  जारी केले ल्या आदेशानुसार लॉकडाऊनचे तांत्रिक कारण पुढे करून सर्व सभा रद्द केल्या होत्या, परंतु आता लॉकडाऊन  मध्ये अनेक बाबींमध्ये शिथिलता  व सूट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता तरी महापालिकेची शेवटची महासभा होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. 

राज्य शासनाचे महापालिका बाबत कायदे एक असताना वसईत महासभा का नाही ?तर..वसई विरार महापालिकेच्या नजीक असलेल्या मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाची महासभा दि.16 जून रोजी संपन्न होत असल्याने महापालिका आयुक्त यांनी वसई विरार मध्ये देखील याठिकाणी मीरा भाईंदर पालिकेच्या धर्तीवर महासभेच्या आयोजनसाठी सर्व त्या उपाय योजना कराव्यात असे पत्र आता महापौर प्रवीण शेट्टी यांनी आयुक्तांना दिले आहे.

आयुक्तांच्या निर्णयाकडे सत्ताधारी बविआचे लक्ष -

महासभा घेण्यासाठी महापौर प्रवीण शेट्टी यांनी आयुक्त गंगाथरन डी यांना पत्र दिले आहे,किंबहुना याअगोदर चे महासभा न घेण्याचे आदेश 31 मे पर्यँत होते,मात्र आता तसा कुठलाच आदेश शासनाकडून प्राप्त नाही त्यामुळे या महापौर पत्रावर आयुक्त  नेमका काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.  दरम्यान आयुक्तांनी प्रभाग समितीच्या सभा घेण्यास परवानगी दिली असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. 

आयुक्त साहेब जात जाता एक तरी सभा होऊन जाऊ दे !

वसई विरार पालिकेची सर्वसाधारण सभा मागील दि.16 मार्च ला झाली होती त्यानंतर कोरोनाचा वाढता  प्राधुरभाव बघता सर्वच सभांना बंदी होती परंतु आता काही निर्बंध कमी झाल्याने पालिकेतील नगरसेवकांची मुदत संपण्यापूर्वी आयुक्तांनी आता  एक तरी सभा घ्यावी अशी मागणी सत्ताधारी सोबत सर्वच नगरसेवक करत आहेत. 

अनेक कामे खोळंम्बली ?  अनेक प्रश्न व विकास कामे ठप्प-

तर पालिकेत नवीन आयुक्त रुजू झाल्यापासून एकही महासभा झालेली नाही. गेल्या दोन महिन्यापासून अनेक प्रश्न प्रलंबित राहिले असून त्यावर सभेत चर्चा होणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे यापूर्वी पालिकेच्या सचिव विभागाने दि.27 मे ला महासभेचे आयोजन केले होते त्यासाठी जाहिरातही काढण्यात आली होती, परंतु अचानकपणे आयुक्त गंगाथरन डी  यांनी शासनाच्या आदेशाचे कारण सांगून ती महासभा रद्द केली होती ,

तर आता वसई विरार पालिकेला लागून असलेल्या मीरा भाईंदर मध्ये शासनाचे सर्व नियम पाळत दि 16 जून ला महासभेचे आयोजन केल्याने या ठिकाणच्या  नगरसेवकांच्याही  आशा वाढल्या असून आपल्याकडेही शेवटची एक महासभा होऊ शकते असे ही सर्वांना वाटत आहे. 

कदाचित आयुक्तांनी महासभेचा धसका घेतलाय वाटतं ?

खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महापालिका प्रशासनावर अंकुश म्हणून वेळच्यावेळी सभा,महासभा, चर्चा ,प्रस्ताव ,धोरण आणि त्यावरील निर्णय या लोकशाहीतील नीतिमूल्ये आहेत,त्याचे पालन होणे आवश्यक आहे, मात्र कोविड मुळे शासनाने काही निर्बंध घातल्याने अडचणी येत आहेत, तरीही सभा झाल्यास  नगरसेवक आयुक्तांना अनेक प्रश्नावर घेरणार  असल्याने यदाकदाचित  आयुक्तांनी धसका घेतला असावा त्यामुळे ही सभाच  घेत नसल्याचे समजते. 

महापौर प्रवीण शेट्टी यांनी तातडीने महासभा लावण्याचे पत्र आयुक्तांना दिले असल्याने आता महासभेचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात असून त्यावर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे जर आता सभा न लागल्यास येणाऱ्या २८ तारखेला आताच्या नगरसेवकांचा  कार्यकाळ संपणार असून याठिकाणी प्रशासकाचा कार्यकाल सुरु होणार आहे आणि पुन्हा हेच आयुक्त प्रशासकाच्या भूमिकेत देखील तेच दिसणार असल्याने सत्ताधाऱ्याच्या अडचणी कमी होत नसून त्या वाढल्या जाणार आहेत. या संदर्भात महापालिका आयुक्त गंगा थ र न यांना संपर्क केला असता तो झाला नाही,

मागील दोन अडीच महिन्या पासून रखडलेली महासभा तातडीने घेण्यासाठी  आपण आयुक्तांना पत्र दिले आहे. आता तर शासनाने अनेक निर्बंध शिथील अथवा कमी केले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात आयुक्त सभा लावण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास आहे. आणि कायदेशीर पालिकेची सभा घेण्याचे महापौर म्हणून मला अधिकार असल्याने या सभेसाठी सर्व व्यवस्था पालिका प्रशासनाने करावयची आहे-  प्रवीण शेट्टी ,महापौर  वसई विरार महापालिका

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर