शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

अंगणवाडीची ८० केंद्रे साकारणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 3:15 AM

अनेक मंजूर अंगणवाडी केंद्रांना निधी नाही, ज्यांना दिला त्यापैकी अनेकांची कामे सुरू नाही जिथे कामे सुरू आहे त्यांची गती कूर्म आहे. अशी अवस्था या तालुक्यातील अंगणवाड्यांची आहे.

- राहुल वाडेकरविक्रमगड : अनेक मंजूर अंगणवाडी केंद्रांना निधी नाही, ज्यांना दिला त्यापैकी अनेकांची कामे सुरू नाही जिथे कामे सुरू आहे त्यांची गती कूर्म आहे. अशी अवस्था या तालुक्यातील अंगणवाड्यांची आहे. यामुळे ८० केंद्रांच्या इमारती साकारणार कधी? हा प्रश्न कायम आहे.तालुक्यात सध्या २४६ अंगणवाडी केंद्रे (मूळ) व ६२ मिनी अंगणवाडी केंद्र कार्यरत आहेत़ विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा, यासाठी शासनाकडून बाल विकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गाव-खेडयापाडयात लोकसंख्येच्या निकषानुसार अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे सुरु करण्यांत आली आहेत़ त्यानुसार गेल्या १७ वर्षापूर्वी विक्रमगड-रोहिदासनगर येथे मिनी अंगणवाडी कार्यरत असून सद्यस्थितीत या मिनी अंगणवाडीच्या परीसराची लोकसंंख्या ५७५ झाल्यामुळे तिचे रुपांतर अंगणवाडीत होणे गरजेचे आहे. तरीही ते झालेले नाही.गेल्या १७ वर्षामध्ये तिचे रुपांतर मुळ अंगणवाडीमध्ये न झाल्याने तिला स्वत:ची अशी वास्तू नाहीच मात्र भाडयाची देखील जागा नसल्याने आज इथे तर उद्या तिथे अशी रोज नवीन जागा तिला शोधावी लागते. याबाबत बाल विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठविलेला असल्याचे सांंगण्यात आले तर मिनी अंगणवाडी करीता इमारतीची तरतूद नसल्याचेही स्पष्ट केले. मात्र यामध्ये शिक्षण घेणा-या लहान बालकांना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो आहे़ आज या अंगणवाडी अंतर्गत ३ ते ७ वर्षा दरम्यानची ३५ मुले, ३ ते ६ वर्षाखालील ४३ मुले, १४ गरोदर माता, ४ स्तनदा माता आणि महत्वाचे म्हणजे मॅमची ४ मुले (१़ अविनाश विलास गवळी, २़ गौरी संजय भोये, ३़ दुर्वेष समीर खुताडे, ४ जय गणेष पडवळे) आहेत़ तालुक्यातील एकूण अंगणवाड्यांपैकी ८० अंगणवाडयांना स्वत:च्या जागा नसल्याने त्या खाजगी इमारतीत, शाळेमध्ये, समाजमंदिरात भरविल्या जात आहेत. अगोदरच शासनाकडून या केंद्रांना पाहिजे तशा सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत. त्यात स्वत:ची इमारत नसल्याने अडचणी समोर येत असतात.या पार्श्वभूमीवर विक्रमगड तालुक्यातील ८० अंगणवाड्यांच्या अनेक नव्या वर्गखोल्या बांधण्याचे प्रस्ताव पाठविण्यांत आले. त्यानुसार काही केंद्रांना मंजुरी देण्यांत आली आहे तर २२ अंगणवाडी केंद्रांच्या इमारतीसाठी मंजुरी नाही तर मंजुर इमारतींची कामेही संथगतीने होत आहेत व काही ठिकाणी सुरुवातही झालेली नसल्याने नवीन अंगणवाडी केंद्रे कधी साकारणार? असाही सवाल या अंगणवाडी केंद्रामध्ये शिक्षण घेणा-या मुलांच्या पाल्यांनी केला आहे़विक्रमगड तालुक्यातील अंगणवाडया व मिनी अंगणवाडया एकात्मिक बाल विकास प्रकल्पातंर्गत चालविल्या जात आहेत.यांसदर्भात वारंवार प्रस्ताव देऊन व मागणी करुनही अंगणवाडीस मंजुर मिळालेली नाही व आज या मिनी अंगणवाडीस जागा नसल्याने यामध्ये शिक्षण घेणा-चा चिमुकल्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहेत तर तालुक्यातील इतरही अंगणावडयांची हीच परिस्थीती असून जवळ जवळ २४६ अंगणवाडी केंद्रापैकी ८० अंगणवाडी केंद्राना इमारती नसल्याने त्या आजही खाजगी जागेमध्ये भरविल्या जात आहेत़ -लक्ष्मण पडवळे, जिल्हा उपध्यक्ष श्रमजीवी संघटनायासंदर्भात प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठवून त्यांच्या आदेशानुसार योग्य ती उपाय योजना केली जाईल-बी़ बी शिंगारे,ए़ बा़ वि़ प्ऱ अधिकारी विक्रमगड