शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

वाड्याला नगरपंचायत कधी

By admin | Published: June 03, 2016 1:42 AM

राज्यातील सर्व तालुका मुख्यालये असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण असून त्या प्रमाणे पालघर जिल्हातील मोखाडा, विक्रमगड व तलासरी या ग्रामपंचायतींना

वाडा : राज्यातील सर्व तालुका मुख्यालये असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण असून त्या प्रमाणे पालघर जिल्हातील मोखाडा, विक्रमगड व तलासरी या ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आला. मात्र वाड्याला या पासून का वगळले, असा प्रश्न चर्चिला जात असून हे काम पालकमंत्री सवरांना झेपणारे नसून त्यासाठी शिवसेनेने आता सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनाच साकडे घालायचे ठरवले आहे. शासनाने १ मार्च २०१४ च्या अधिसूचनव्दारे १० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या व तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक २७ जुलै २०१५ रोजी जिल्हा परिषदेला पाठविलेल्या पत्रान्वये तसे प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने वाडा ,मोखाडा, विक्रमगड व तलासरी या ग्रामपंचायतींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रस्ताव ७ नोव्हेंबर २०१५ रोजी ग्रामविकास विभागाकडे पाठविले होते. या प्रस्तावानुसार वरील चारही तालुकास्तरीय ग्रामपंचायतीना नगर पंचायतीचा दर्जा देणे आवश्यक होते. मात्र ७ मे २०१६ च्या अधिसूचनेनुसार जिल्हयातील विक्र मगड, मोखाडा व तलासरी या नगरपंचायतीची निर्मिती करण्यात आली. मात्र झपाटयÞाने विस्तारणाऱ्या वाडासारख्या मोठ्या ग्रामपंचायतीला यातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हयातील वाडा, विक्र मगड, तलासरी व मोखाडा या चारही तालुकास्तरीय ग्रामपंचायतीचे प्रस्ताव असताना नगरविकास विभागाने विक्रमगड, मोखाडा व तलासरी या तीनच नगरपंचायतीची घोषणा केली. मात्र यातून वाडा वगळण्याने पालकमंत्र्यांचे राजकीय बळ कमी पडले, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. तर काही जाणकार या निर्णयाला स्थानिक राजकारणाची फोडणी असल्याचेही छातीठोकपणे सांगतात. खरे तर वाडा तालुका हा औद्योगिकीकरणासाठी प्रसिद्ध आहे. शेकडो कारखाने डी प्लस झोनमुळे वाडा तालुक्यात आहेत. या कंपन्यामुळे नोकरी कामधंद्यासाठी आलेल्यांची संख्या वाड्यात वाढली आहे. अनेक शासकीय व निमशासकीय कर्मचारी येथे राहतात. त्यामुळे वाडा गावाचे नागरीकरण झपाटयÞाने वाढत आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार असणाऱ्या आकडेवारीपेक्षा वाड्याची लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. त्यामुळे वाडा गावात नागरी समस्यांचा ताण वाढत आहे.या नागरी समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता ग्रामपंचायतीची नसल्याने सर्वात आधी वाड्यात नगरपंचायत होणे अपेक्षित होते. वाड्याची नगरपंचायत व्हावी या करिता स्थानिकांनी सातत्याने लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेकडे मागणी केली होती. तालुकास्तरीय ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्याचे धोरण शासनाने जाहीर केल्यापासून वाडावासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र नुकत्याच नगरपंचायतींच्या घोषणा करतांना वाड्याला वगळल्याने जनतेत नाराजी पसरली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा हे वाड्यात राहात असून त्यांचे निवासस्थान असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)