शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी केला पलटवार, काय दिलं उत्तर?
2
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
3
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
4
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
5
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
6
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
7
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
8
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
9
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
10
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
11
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
12
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
13
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
14
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
15
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
16
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
17
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
18
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
19
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
20
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात

एकवीरा देवस्थानचा अधिकार नक्की कोणाकडे? भाविकांमध्ये संभ्रम, एकवीरा ट्रस्टच्या अध्यक्षपदी विजय देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 3:42 AM

वेहेरगाव : एकवीरा देवस्थानाचे अधिकार नक्की कोणाकडे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष तरे आहेत. तर नऊ पैकी सात विश्वस्तांनी नवे अध्यक्ष म्हणून विजय देशमुख यांची शनिवारी निवड केली आहे. त्यामुळे अध्यक्ष कोण? याबाबत भाविकांमध्ये संभ्रम पसरला आहे.

भाऊसाहेब हुलावळेवेहेरगाव : एकवीरा देवस्थानाचे अधिकार नक्की कोणाकडे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष तरे आहेत. तर नऊ पैकी सात विश्वस्तांनी नवे अध्यक्ष म्हणून विजय देशमुख यांची शनिवारी निवड केली आहे. त्यामुळे अध्यक्ष कोण? याबाबत भाविकांमध्ये संभ्रम पसरला आहे.३ आॅक्टोबरला एकवीरा मंदिराच्या कळसाची चोरी झाली,या घटनेला तीन आठवडे होऊन गेले तरी अद्याप तिचा तपास लागलेला नाही, आणि आता तो कधी लागेल ते सांगता येणार नाही कारण ज्यांनी त्याचा पाठपुरावा करायचा त्या देवस्थांन विश्वस्तांमध्येच बारभाई माजली आहे. सध्या देवस्थानच्या नऊ विश्वस्तांमध्ये फूट पडली असून सात विश्वस्त एका बाजूला आहे तर, अध्यक्ष, उपाध्यक्ष, असलेले अनंत तरे व मदन भोई दुसºया बाजूला आहेत, सातजणांनी एकत्र येऊन सचिव संजय गोविलकर यांच्यासह गडावर बैठक घेऊन देवस्थानच्या अध्यक्षपदी विश्वस्त विजय देशमुख, उपाध्यक्षपदी विश्वस्त काळूराम देशमुख, यांची तर खजिनदारपदी पार्वताबाई पडवळ यांची निवड केली, तसे पत्रक सचिवांच्या सहीने काढण्यात आले, आता प्रश्न असा उभा राहिला आहे की, विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा दिल्याशिवाय, किवा धर्मादाय आयुक्तांनी त्यांना त्या पदावरून हटविल्याशिवाय त्यांना त्या पदावरून दूर करता येत नाही. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने विद्यमान अध्यक्ष विरूध्द काही चुकीच्या निर्णयाबद्दल ठोस पुरावे असतील तर धर्मादाय आयुक्त त्यांना पदच्युत करून नवीन अध्यक्ष म्हणुन एखाद्या विश्वसाताची तात्पुरती अध्यक्ष म्हणुन निवड करू शकतात किंवा प्रशासक नेमू शकतात असा कायदा असतांना व यापैकी काहीही घडले नसतांना किंवा त्यांच्याविरूध्द अविश्वास ठरात समंत झाला नसताना कुठल्या नियमांच्या आधारे सात विश्वस्तांनी एकत्र येऊन नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली, ही बैठक धर्मादाय आयुक्तांच्या अथवा महसूल यंत्रणेच्या अधिकाºयांनी बोलाविलेली नसतांना ती वैध ठरू शकेल काय? असा प्रश्न आहे.त्यामुळे ज्यांच्याकडे बहुमत आहे ते अध्यक्ष वैध नाहीत. व जे रितसर अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे बहुमत नाही. अशी परस्परविरोधी स्थिती आहे.असा पेच उभा राहीला आहे,यामुळे देवस्थानचे पदाधिकारी नेमके कोण व अधिकार कोणाला असा संभ्रम भाविकांनमध्ये उभा राहीला आहे ,संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या एकवीरा देवीच्या देवस्थानचा वाद अशाप्रकारे चव्हाट्यावर येणे हे दोन्ही बाजुकडील मंडळीना शोभणारे नाही. खरे तर दोन्ही बाजुकडुन कळसाच्या चोरीचा तपस लावून त्याची पुनर्रस्थापना करून देवस्थानचे पावित्र्य जपणे महत्वाचे होते,किंवा खासदार श्रीरंग बारणे यांनी कळस बसविण्याची तयारी दर्शविली होती,तर नवीन कळस तरी आधी उभारायचा होता, मग काय एकमेंकावर करायची ती आगपाखड करायची होती, अशी भावना भाविकांची आहे.लोणावळा : एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी ९ पैकी ७ विश्वस्तांनी विजय विठ्ठल देशमुख यांची निवड केली. सचिव संजय गोविलकर यांच्या उपस्थितीत शनिवारी मागणी बैठक झाली. तीन आॅक्टोबर रोजी कार्ला गडावरील एकवीरा देवीच्या मंदिराचा कळस चोरीला गेला होता. याला विश्वस्त मंडळाची हलगर्जी जबाबदार असल्याचा ठपका ठेवून वेहेरगाव ग्रामस्थांनी े अध्यक्ष अनंत तरे व सर्व विश्वस्तांनी राजीनामा द्यावा अशी मागणीकरून सात दिवस हार, फुले व प्रसादाची दुकाने बंद ठेवली होती. गावातील पाच विद्यमान विश्वस्तांनी राजीनामे दिले. पण, अनंत तरे व इतर राजीनामा देत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. दुसरीकडे वेहेरगावातील पाच व देवघर येथील दोन अशा सात विश्वस्तांनी बैॅठक घेण्याची मागणी केली होती. तीनुसार विश्वस्त मंडळाच्या कार्यालयात गोविलकर यांनी बैठक घेतली. तीमध्ये अध्यक्षपदी विजय देशमुख, उपाध्यक्षपदी काळूराम देशमुख व खजिनदारपदी पार्वताबाई पडवळ सचिवपदी संजय गोविलकर, विश्वस्त म्हणून निलम येवले, विलास कुटे व नवनाथ देशमुख यांची निवड झाली.तरे म्हणतात, बैठकच अवैधट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अनंत तरे यांनी या निवडीला आक्षेप घेतला असून, त्या बेकायदेशीर आहे असे म्हटले आहे.