शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

पालघरमध्ये वाढलेल्या मताचा फायदा नक्की कोणाला होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 12:49 AM

पालघरमधील मतदानाचा टक्का यावेळी वाढल्याने या वाढीव मतांचा फायदा नक्की कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नालासोपारा - एप्रिल महिन्याच्या कडक तापलेल्या उन्हात, आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये २९ एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यातील पालघरचीनिवडणूक पार पडली असून १२ उमेदवारांच्या लढतीमध्ये बविआचे बळीराम जाधव आणि शिवसेनेचे राजेंद्र गावित यांच्यातच मुख्य लढत पहायला मिळाली. पालघरमधील मतदानाचा टक्का यावेळी वाढल्याने या वाढीव मतांचा फायदा नक्की कोणाला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते वसई आणि नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात झालेले मतदान हे बविआ आणि महाआघाडीला झाल्याचे वाटते पण विक्र मगड, पालघर आणि बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेना आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.पालघर लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी बहुजन विकास आघाडीला जाहीर पाठींबा दिल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी मेहनत घेतल्याने मतदारांनी बविआच्या पारड्यात मते टाकली आहेत. तर दुसरीकडे श्रमजीवी संघटनेने महायुतीला पाठींबा देऊन सेनेच्या उमेदवाराला प्रामाणिकपणे मदत केल्याचे चित्र दिसून आले.३ वेळा झालेले मतदान (२०१४ ते २०१९)...२०१४ साली ९,९२,२८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ६२.९० टक्के २०१८ साली झालेल्या पोटनिवडणुकीत ८,६९,९८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ५३.२२ टक्के मतदान झाले.आमचाच विजय , सोशल मीडियावर रोज वॉर२९ एप्रिलला मतदान झाल्यापासूनच सोशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम, वॉट्सअ‍ॅप, ट्विटर यांच्यावर पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आमच्याच पक्षाचा उमेदवार निवडून येईल असा वॉर आजपर्यंत सुरू आहे. थोड्याफार मतांच्या फरकाने का होईना पण आमचा उमेदवार निवडून येईल हे दाखवण्यासाठी आपआपल्या मतदानाची बेरीज लावून भविष्यवाणी करण्यासाठीही काही जण मागे पुढे पहात नाही.वेध मतमोजणीचे : पालघरवासियांना आता २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवसाचे वेध लागले असून पालघरचा खासदार कोण होणार, अशी चर्चा गावागावातील नाक्यावर रंगू लागली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात एकूण १२ लाख १ हजार २९८ इतके मतदान झाले आहे. जो उमेदवार ५ लाख ५० हजाराचा पल्ला गाठेल, तो सिकंदर ठरणार आहे. गेल्या लोकसभा पोटनिवडणूकीमध्ये ९ लाख मतदान झाले होते.सहा विधानसभा मतदार संघातील मतदानडहाणू विधानसभा मतदारसंघातील झालेले मतदान 1,81,252 (67.13 टक्के)विक्र मगड विधानसभा मतदारसंघातील मतदान 1,83,584 (69.50 टक्के)पालघर विधानसभा मतदारसंघातील मतदान 1,85,943 (68.57 टक्के)बोईसर विधानसभा मतदारसंघातील मतदान 2,04,049 (68.49 टक्के)नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मतदान 2,54,313 (52.16 टक्के)वसई विधानसभा मतदारसंघातील मतदान 1,92,157 (65.24 टक्के)

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघरElectionनिवडणूक