सुनिल घरत / पारोळवसई किल्ल्यातील नागेश महातीर्थ तलाव १३ व्या शतकापासून इतिहासाचा साक्षीदार आहे. शेष वंशीय घराण्यातील नाथाराव भंडारी भोगले यांनी १९३४ च्या कालखंडात या ठिकाणी किल्ला ही बांधला होता. त्यातूनच या प्रांताचा कारभार चालत असे. पुढे पोर्तुगीजांनी ही वास्तू नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तर १७३९ च्या वसई विजयानंतर चिमाजी आप्पांनी नागेश्वर मंदिराची पुनर्बांधणी करुन संस्कृतीचे संवर्धन केलेया नागेश्वर तीर्थ तलावाला मोठा ऐतिहासीक संदर्भ असतानाही या तलावाची दुरावस्था झाली असून अनेक वर्षांपासून गाळ साठला असून वास्तूचे भग्न अवशेष परिसरात विखुरलेले आहेत. तलावाचे अस्तित्व जपणारे घाट नामशेष होण्याच्या मार्गावर असून पुरातत्व विभाग ही या ऐतिहासिक वास्तू कडे दुर्लक्ष करीत आहे.किल्ले वसई मोहिमेत २००७ व २०१० या साली या तलावातील प्लॅस्टिक व कचरा स्वच्छ करण्यात आला. पण पर्याटकांनी धार्मिक विधी करतांना निर्माल्य व पूजा साहित्य पुन्हा परिसरात टाकल्याने स्थिती जैसे थे झाली. या तलावात होणारी मासेमारी यामुळे ही ऐतिहासिक वास्तू कचरा कुंडी झाल्याचे किल्ले वसई चे श्रीदत्त राऊत यांनी सांगितले.येथील लोकप्रतिनिधी यात कधी लक्ष घालणार? असा सवाल रहिवासी करीत आहेत.
प्राचीन नागेश्वर तलाव दुर्लक्षामुळे होणार नामशेष?
By admin | Published: March 31, 2017 5:29 AM