शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

यंदा तरी मोखाडावासीयांच्या समस्या सुटतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 6:00 AM

शासन पातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास अजतायत संपलेला नाही. यामुळे या नवीन वर्षात तरी मोखाडा वासीयांच्या रोजगार, आरोग्य, पाणी, कुपोषण, शिक्षणाच्या समस्यां सुटतील का असा प्रश्न येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारला जात आहे

मोखाडा : शासन पातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास अजतायत संपलेला नाही. यामुळे या नवीन वर्षात तरी मोखाडा वासीयांच्या रोजगार, आरोग्य, पाणी, कुपोषण, शिक्षणाच्या समस्यां सुटतील का असा प्रश्न येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना विचारला जात आहेस्वातंत्र्याची ६७ वर्ष उलटली असताना येथील आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणी , वीज, इत्यादी मूलभूत सुविधां पासून येथील भूमिपुत्र कोसोदूरच आहे. इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी येथील भूमिपुत्र वर्षानुवर्ष स्थलांतरित होत आहे दिवाळीचा सणाचा आनंद मावळताच येथील आदिवासी रोजगाराच्या शोधात आपल्या अठरा विश्व दारिद्र्याचे गाठोडे बांधून शहराकडे रवाना झाला आहेयेथील कुपोषण तर पाठ सोडायला तयार नाही दरवर्षीच कुपोषण बळीच्या अनेक घटना घडत असल्याने कुपोषण निर्मूलनाचा दावा करणारे प्रशासन अपयशी ठरले आहे कुपोषणाचे प्रमुख कारण रोजगार असल्याने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचं आहे परंतु तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे कायम स्वरूपी रोजगार देणारी कसलीच यंत्रणा येथे उपलब्ध नाही केलेल्या कामाचा मोबदला वर्षवर्ष होऊनही मिळत नाहीशहरासह ग्रामीण भागात वीज पुरवठा करणारे विजेचे खांब जीर्ण झाले असल्याने विज सेवेचा नेहमीच लफंडाव असून त्यातच सततचे भारिनयमन व वाढीव बिल आकारणी यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे तालुक्याच्या ठिकाणी असलेले एकमेव ग्रामीण रु ग्णालय व आरोग्य केंद्रात सोईसुविधा मिळत नसल्याने खाजगी रु ग्णालयातील महागडा उपचार घ्यावा लागत आहे.रुग्णांना उपचारासाठी नाशिक मुबंई ठाणे धाव घ्यावी लागते मोखाद्यात पाच मोठी मोठी धरणे असून देखील दरवर्षी डिसेंबर महिन्यापासूनच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे शिक्षण ज्ञानाचा तिसरा डोळा असे सांगितली जात असले तरी येथे रयतचे महाविद्यालाय आण िखोडाळ्याचे मोहिते कॉलेज सोडले तर इतर शिक्षणाची कोणतीच सोय नाही यामुळे येथील आदिवासी मुलांना नाशिक वसई पुणे मुबंई ठाणे येथे शिकायला जावे लागते.सार्वजनिक बांधकाम रस्ते विकासाच्या नावाखाली करोडोचा दरवर्षी खर्च करते तरी देखि खोडाळा मोखाडा जव्हार त्रिंबकेश्वर या मुख्य रस्त्याची दुरावस्थेत फारसा बद्दल झालेला नाही- मोखाडा तालुक्याचे ठिकाण असूनही येथे मनोरंजनाचे साधन नाही चित्रपटगृह नाही येथील परिसर डोंगर दर्या खाºयांनी नटलेला आहे. देवबांधचे गणपतीचे मंदिर अशोका धबधबा वाशाळा येथील बुद्ध लेणी पेंडक्याची वाडी येथील कमाणीचा धबधबा व प्राचीन वास्तू अशा विविधतेने हा परिसर नटलेला असून देखील प्रशासनाने पर्यटनासाठी प्रयत्न केलेले नाहीत यामुळे येथील आदिवासी आजही दारिद्याच्या काळोखातच चाचपडत असल्याने यामुळे या नवीन वर्षात तरी सोईसुविधा पुरवण्याचा शहाणपण येथील प्रशासन व लोकप्रतिनिधींना सुचेल का हा प्रश्न आहे.विकास कुठे गेला?तालुक्यातील बिवलपाडा रुईपाडा फनसपाडा कुर्लोद सावर्डे कुडवा अशा विविध गावपाड्यांना अजून पर्यंत शासनाच्या कोणत्याच सोईसुविधा पोहचलेल्या नसून काही गावपाड्यांना विजेचा प्रकाश बघायला सुद्धा मिळालेला नाही. यामुळे डिजटल इंडिया, बुलेट ट्रेन, मेक इन इंडिया, म्हणजे काय रे भाऊ असाच सवाल विचारला जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार