पालघर : न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेला धूपप्रतिबंधक बंधारा आणि खाडीत साचलेला गाळ या सातपाटीच्या महत्वपूर्ण प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून उपाययोजना आखू असे आश्वासन उत्तरप्रदेश चे राज्यपाल राम नाईक यांनी सातपाटीकराना दिले.
राज्यपाल नाईक आणि सातपाटी ग्रामस्थांचे जिव्हाळ्याचे नाते असून त्यांच्या प्रयत्नाने पश्चिमेस उभारण्यात आलेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यामुळे गाव सुरक्षित राहिले होते. या कामामुळे प्रभावित होत ग्रामस्थानीही त्यांच्या झोळीत भरभरून मताचे दान टाकीत त्यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. रविवारी राज्यपालांनी सातपाटी मच्छीमार सहकारी संस्थेला भेट देत मच्छीमाराना भेड सावणाºया समस्या जाणून घेतल्या. यावेळी समुद्रातील पालघर-डहाणू तालुक्यातील गावासमोरील समुद्रात झालेल्या अतिक्र मणामुळे सुरू असलेला हद्दीचा वाद, हरित लवादाच्या तावडीत सापडलेल्या धूपप्रतिबंधक बंधाºयामुळे गावावर ओढवलेली आपत्ती, खाडीत साचलेला गाळ आदींसह राष्ट्रीय पातळीवरील समस्या नरेंद्र पाटील, चेअरमन राजन मेहेर, सुभाष तामोरे आदींनी मांडल्या.
या समस्यांवर उपाययोजना आखण्यासाठी आपण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन असे आश्वासन उपस्थित मच्छीमाराना दिले तर आपण निवडून आल्यानंतर मिळालेल्या अल्पकालावधीचा उपयोग मच्छीमारांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी आपण करीत असल्याचे खासदार गावित यांनी सांगितले. यावेळी समुद्रात बुडत असलेल्या मच्छीमाराना वाचिवणारे सातपाटीचे मच्छिमार मिलन तरे, धवल धनू तर डहाणू समोरील समुद्रात बुडत असलेल्या मच्छीमाराना वाचिवणारे डहाणूचे मच्छीमार अशोक आंभिरे व त्याचा मुलगा आनंद आंभिरे यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला.