नितीन पंडित, भिवंडी
मुलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या भिवंडी महापालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकून परतत असलेल्या डंपरचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या खासगी वाहनांची कशी दखल घेतली जाते हे या घटनेतून समोर आले आहे. कोट्यवधी रु पये कंत्राटदाराच्या घशात घालूनही वाहनांचे अशा प्रकारे ब्रेक फेल होणे म्हणजे पालिका प्रशासन फेल झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या दुर्दैवी घटनेतून घनकचरा व्यवस्थापन विभागात सुरु असलेला भ्रष्टाचारही समोर आला आहे.
महापालिकेकडे स्वत:ची कचरा उचलण्याची वाहने नाहीत ही दुर्दैवी गोष्ट आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पालिकेतील सर्वच विभागांची चौकशी केली तर घोडाळ््यांची मालिका बाहेर निघेल. सहाशे साडेसहाशे कोटींचे वार्षिक बजेट असल्याने वर्षाला किमान पाच ते सहा वाहने खरेदी केली असती तरी आतापर्यंत महापालिकेकडे स्वत:ची वाहने असती. मात्र खासगी कंत्राटदारांकडून संबंधित अधिकाऱ्यांना मिळणाºया आर्थिक मलिद्यापासून आपल्याला अलिप्त राहावे लागेल याची जाण काही सुज्ञ अधिकारी व लोकप्रतिनिधींना आल्यानेच आतापर्यंत भिवंडी महापालिकेत कचरा उचलण्यासाठी भाड्याने वाहने मागवावी लागत आहेत.महापालिकेत कचरा उचलण्यासाठी पालिकेकडे ९४ घंटागाड्या, ५१ डंपर तर १६ जेसीबी अशी वाहने आहेत. विशेष म्हणजे या वाहनांमध्ये ९४ घंटागाड्यांवर महिन्याला ३२ लाख ४८ हजार ६४० रु पये तर ५१ डंपरसाठी ३९ लाख २७ हजार ५१० रु पये तर १६ जेसीबीसाठी ३२ लाख ४० हजाररु पयांपर्यंत भाडे कंत्राटदारावर खर्च करते. कोट्यवधींची उधळण करूनही वाहने भंगार अवस्थेतील आहेत. अनेक कचरावाहू वाहनधारक चालकांकडे वाहन चालविण्याचा परवानाही नाही, आवश्यक कागदपत्रेही नाहीत. आर्थिक फायद्यामुळे कचरा वाहतूक करणाºया वाहनांवर अधिकाऱ्यांचे कोणतेही निर्बंध नाहीत.कचरा वाहतूक करणाºया गाड्या जशा पूर्ण झाकलेल्या असतात तशी प्रथा भिवंडीत कुठेच नाही. उघड्या डंपरमधून कचरा भरून तो शहरातील मुख्य रस्त्यांवरून डम्पिंग ग्राउंडवर नेण्यात येतो. अनेकवेळा कचरा डंपरच्या मागे असलेल्या नागरिकांच्या अथवा दुचाकीस्वारांच्या अंगावर पडतो. मात्र याकडे पालिका दुर्लक्ष करते.शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीगडम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने शहरात ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले असून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे .