हुसेन मेमनजव्हार : तालुक्यातील दादरकोपरा ढाढरी रस्त्याची दैयनिय अवस्था झाली असून, या नादुरु स्त रस्त्यामुळे सात वर्षापासून एसटी बंद असल्यामुळे या परिसरातील नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत. तर त्या भागात खाजगी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. येथील ग्रामस्थ सरपंचांनी ग्रामसभेत ठराव घेवून अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, नादुरुस्त रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि परीवहनमंत्री दिवाकर रावते यांनाच रावते-पाटील इकडे लक्ष द्याल का ? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
दादरकोपरा ढाढरी रस्त्यालगत खोलदरी असल्याने अपघाताची शक्याता आहे. या रस्त्यात मोठं मोठाले खड्डे पडले असून, परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. येथील नागरिकांना बस गाठण्यासाठी ३ कि.मी. डोंगरदरी चढून दादरकोपरा गावात येवून बस गाठावी लागत आहे. त्यातच आजारी रु ग्ण व गरोदर महिलांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम होनार कधी? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. २०१६ मध्ये सारसून दादरकोपरा ढाढरी या डांबरीकरण रस्त्याच्या कामाला दोन वर्षापूर्वी मजुरी मिळाल्याचे बोलले जाते. मात्र रस्त्याचे काम मजूर नसल्याचे बांधकाम विभागाकडून बोलले जात आहे. या रस्त्याचे काम २५ ते ३० वर्षापूर्वी डांबरीकरण केले आहे.आम्ही ग्रामस्थांनी ग्रामसभेत नादुरु स्त रस्त्यासाठी अनेक वेळा ठरव घेवून बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करीत आहोत. मात्र याकडे कोणाचेही लक्ष दिसत नाही.- सुभाष भोरे,ग्रा. ढाढरी सरपंच