शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
2
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
3
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
4
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
5
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
6
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
7
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
8
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
9
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
10
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
11
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
12
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
13
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
14
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
15
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
16
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
17
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
18
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
19
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
20
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान

सख्ख्या भावाच्या खून प्रकरणातील साक्षीदाराला मिळेना पोलीस संरक्षण, शासकीय यंत्रणांचे असहकार्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 8:33 AM

१९८८ साली कामण येथील यादव म्हात्रे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्या वेळी या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांचे सख्खे भाऊ गंगाधर म्हात्रे हे होते.

आशीष राणे -वसई : ३२ वर्षांपूर्वी सख्ख्या भावाच्या खुनाच्या प्रकरणात  प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ आदिवासी समाजसेवकाची पोलीस संरक्षणासाठी वणवण सुरू आहे, मात्र शासकीय पातळीवर त्यांची ससेहोलपट होत असल्याची गंभीर बाब ऐरणीवर आली आहे. (Witness in of brother's murder case without police protection)

१९८८ साली कामण येथील यादव म्हात्रे यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. त्या वेळी या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्यांचे सख्खे भाऊ गंगाधर म्हात्रे हे होते. त्यांच्या साक्षीवरून आरोपींचा शोध लागून हा खटला अंतिम टप्प्यात आला आहे. त्यासाठी म्हात्रे यांना ३२ वर्षे एकाकी लढा द्यावा लागला आहे.

गंगाधर म्हात्रे यांच्यावरही प्राणघातक हल्लाही झाला होता. त्यानंतर म्हात्रे यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता मे २०१७ ला पालघर ग्रामीण पोलीस दलाकडून अचानकपणे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले. त्यामुळे गंगाधर म्हात्रे यांनी त्या वेळी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर, न्यायालयाच्या आदेशानुसार एप्रिल २०१८ ला त्यांना पुन्हा संरक्षण देण्यात आले. परंतु तेही डिसेंबर २०१९ ला काढून घेण्यात आले. त्यामुळे म्हात्रे यांनी पुन्हा एकदा दि. १९ डिसेंबर २०२० ला मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि सीआयडीकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली. दरम्यान, दि. २० जानेवारी २०२१ रोजी सीआयडी कोकण भवनच्या उपअधीक्षक केतकी खोत यांनीही पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून कार्यवाहीची सूचना केली आहे, मात्र तीन महिने होत आले तरी त्यांना अद्याप पोलीस संरक्षण देण्याच्या कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.

मयत यादव म्हात्रे खुनाचा खटला अंतिम टप्प्यात आला आहे. या प्रकरणात माझ्यावर प्राणघातक हल्लाही झाला होता, तर मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यामुळे मला पूर्णपणे  संपवण्याचा प्रयत्न कधीही करण्यात येईल. त्यासाठी मला अपघातात किंवा गुंडांकरवी ठार मारण्याचीही शक्यता अधिक आहे.- गंगाधर म्हात्रे, आदिवासी सेवक 

आदिवासी समाजसेवक गंगाधर म्हात्रे यांच्या पोलीस संरक्षण मागणीबाबतीत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार विरार व वालीव पोलीस स्टेशनमधून प्रत्यक्ष व वास्तव स्थिती काय आहे याचा अहवाल मागविण्यात आला असून, लवकरच तो पोलीस आयुक्तांना पाठविण्यात येईल. - प्रशांत वाघुंडे, वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ-२ वसई पूर्व 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसVasai Virarवसई विरार