निखिल मेस्त्रीनंडोरे: पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राइम इंडस्ट्रीज या भांडी तयार करण्याच्या कंपनीत बुधवारी संध्याकाळच्या सुमारास काम करीत असताना भावना पाटील या महिला कामगाराचा उजवा हात मशीनीत जाऊन दाबला गेल्याने तिची तीन बोटे निकामी झाल्याची घटना घडली आहे.पती भूपेशसह भावना गेल्या दोन वर्षांपासून या कंपनीत काम करीत आहेत. दुपारचे जेवण झाल्यानंतर भावना पाटील प्रेस मशीनवर काम करण्यासाठी गेल्या होत्या. काम करत असताना अचानक प्रेस (उच्च दबाव यंत्र) दाबली गेली त्यात त्यांच्या उजव्या हाताचा तळवा या मशीनमध्ये सापडला व त्यात त्यांच्या तिन्ही बोटं निकामी झाली.या घटनेनंतर कंपनीच्या निरीक्षक आनंद सिंग यांनी त्यांना पालघर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या हाताच्या बोटाना बरेच फ्रॅक्चर आल्याचे सांगितले. जखमा बºया झाल्यानंतरच त्यावर शस्त्रक्रीया करता येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर जखमी भावना यांना नातेवाईकांच्या हवाली करुन निरिक्षक निघुन गेला.वास्तविक तिच्या संपुर्ण जबाबदारी कंपनी प्रशासनाने स्विकारणे अपेक्षित असतांना त्यापासून पळणाºया प्रशासनाला चहाडे गावचे सरपंच अजय पाटील यांनी जाब विचारल्यानंतर रात्री उशिरा कंपनीचे एचआर मॅनेजर तरे यांनी पिडीतेची भेट घेतली व कंपनी प्रशासन संपुर्ण खर्चाची जबाबदारी स्विकारेल असे गावकºयांना सांगितले.>अशी होते पिळवणूकप्राईम इंडस्ट्रीज ही कंपनी कर्मचाºयांना रोखीने पगार देत असल्याचे या घटनेनंतर समोर येत आहे. भावना पाटील यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न देता कंपनीने जोखमीच्या मशीनवर कामावर ठेवले. तिला आठ ते दहा तास काम करून ताशी २२ रु पये ५० पैसे प्रमाणे अत्याल्प रोजगार मिळत होता.त्यातून तीन मुलांचा सांभाळ करणाºया पाटील कुटुंबाचा विचार कंपनी करणार का ? भावना यांचे होणारे नुकसान कंपनी भरून देणार का असा सवाल नातेवकांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सलग काम करूनही कंपनीने नियमांप्रमाणे भावना पाटील यांना कायम केले नाही. त्यांचा हक्काचा भविष्य निर्वाह भत्ता कापलेला नाही.>कंपनीने कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांना यंत्रावर कामास ठेवले हे चुकीचे आहे. भावना बरी होईपर्यंत कंपनीने त्यांचा औषधोपचारासाठी खर्च करावा तसेच त्यांना कंपनीने कायमस्वरूपी काम द्यावे.- अजय पाटील,प्रभारी सरपंच, चहाडे
मशिनमध्ये सापडून महिलेची बोटे निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 2:39 AM