पालघर : वैतरणा खाडी पुलावरून पाण्यात पडलेल्या वाढीव येथील बेबीबाई भोईर (६०) या महिलेचा शोध घेण्यासाठी वसई-विरार महानगर पालिका अग्निशमनचे जवान आणि स्थानिक ग्रामस्थांचे प्रयत्न निष्फळ ठरले असून २७ तासाचा अवधी उलटल्यानंतरही त्या महिलेचा थांगपत्ता लागलेला नाही.
केळवे-मायखोप येथे राहणाऱ्या आपल्या मुलीला पालघरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केल्याने बेबीबाई या जेवणाचा डबा घेऊन वैतरणा पुलावरून वैतरणा स्थानकात पायी जात होत्या. पालघरकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी धोकादायक पुलावरून जात असताना प्रशासनाने पुलावर लावलेल्या लोखंडी पट्ट्यामधील फटीत पाय जाऊन त्या खाली खाडीत कोसळल्या. मुसळधार पाऊस आणि उधाणाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या जोरदार प्रवाहात त्या वाहून गेल्या. रात्रभर ग्रामस्थांनी परिसरातील किनाºयालगत शोध घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता.ग्रामस्थांनी वसई-विरार महानगर पालिकेकडे मदतीसाठी विनंती केल्यानंतर शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून अग्निशमन व आणिबाणी सेवा दलांच्या जवानांनी होड्याद्वारे थेट नारिंगी भागात जाऊन शोध घेण्याचे काम हाती घेतले होते. तर वाढीव आदी भागातील १० ते १५ मोटारसायकल घेऊन अनेक तरुण चिखल डोंगरी, नारंगी पाडा, म्हारंबळ पाडा, वसईमधील अर्नाळा कळंब आधी भागातील किनाºयावर या महिलेचा शोध घेत आहेत. जवानांनी समुद्रात गळ टाकून तर किनाºयालगतच्या तिवरांच्या जंगल सदृश भागातही शोध घेण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची माहिती ग्रामस्थ अमित पाटील यांनी दिली.