शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

सातपाटी बंधारा बांधणार श्रमदानातून

By admin | Published: July 07, 2016 3:04 AM

सातपाटी गावाला स्वातंत्र्य संग्रामातील सहभागाबरोबरच हौतात्म्य पत्करण्याचा इतिहास आहे. मच्छिमारी व्यवसायावर संकटे आल्यास ती दूर करण्यासाठी एकजूट दाखवून १९८० साली खाडीत बॅक वॉटर

- हितेन नाईक,  पालघर

सातपाटी गावाला स्वातंत्र्य संग्रामातील सहभागाबरोबरच हौतात्म्य पत्करण्याचा इतिहास आहे. मच्छिमारी व्यवसायावर संकटे आल्यास ती दूर करण्यासाठी एकजूट दाखवून १९८० साली खाडीत बॅक वॉटर बंधारा श्रमदानातून उभारण्याचा गौरवशाली इतिहासही त्याला आहे. अशावेळी आपण मागील दहा वर्षापासून आपला संरक्षक बंधारा फुटल्याने शासन आणि लोकप्रतिनिधींच्या नावाने बोटे मोडून निधीची भीक मागण्यापेक्षा तो श्रमदानातून व लोकवर्गणीतून उभारण्याचा निर्णय येथील श्रीराम मंदिरात बुधवारी झालेल्या निर्धार बैठकीत घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून श्रमदानाला सुरुवात होणार आहे. ताडी माडी संस्था, कांचन पाटील हे या कामी दोन जेसीबी देणार असून रेती वाहतूक संघटनेने फावडे, घमेले तर गणपती सार्वजनिक मंडळाकडून तसेच सहकारी संस्थाकडून वैयक्तिक देणग्या देण्याचे एकमताने ठरविले आहे.सर्वात जास्त स्वातंत्र्यसैनिक असलेले गाव म्हणूनही सातपाटीची नोंद असून स्वांतत्र्यसंग्रामाची ज्वाला धगधगती ठेवण्याचे कार्यही गावाने केले आहे. सातपाटी हे एक प्रगतीशील बंदर असून चारशे ते पाचशे लहान मोठया बोटी व्दारे येथे मासेमारी केली जाते. लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे गाव म्हणून सातपाटीची ओळख असून १८ ते २० हजार इतकी कागदोपत्री लोकसंख्या नोंद असली तरी मासेमारी व्यवसायाशी निगडीत लोक पहाता २५ ते ३० हजार लोक गावात रहात आहेत.सन १९८० दरम्यान मासेमारी चांगली होत असताना अचानक खाडी मधील नौकामन मार्गात गाळ साचून मासेमारी पुढे संकट उभे राहीले होते. हे बंदर बंद होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर व्यवसायावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करूनही हाती काही पडत नसल्याने गावातील दोन्ही सहकारी संस्था, ग्रामपंचायत विविध सामाजिक संघानी एकत्र येत एकजुटीने श्रमदानातून बंधारा उभारण्याचा निर्णय घेतला होता. पर्यावरणाचा समतोल बिघडू लागल्यानंतर व समुद्राच्या पातळीत सतत वाढ होवू लागल्याने समुद्री लाटांचे जोरदार तडाखे सन २००३ साली बांधलेल्या बंधाऱ्याला बसू लागले. परिणामी बंधाऱ्यातील दगड लाटांच्या तडाख्याने बाहेर फेकले जावून बंधाऱ्याला भगदाडे पडली. तर काही दगड किनाऱ्यावरील रहाणाऱ्या लोकांनी खाजगी वापरायला सुरूवात केली. त्यात सर्व गाळ बंधाऱ्यालगत येऊन साठू लागल्याने बंधाऱ्याची उंची कमी झाली. परिणामी समुद्राच्या लाटा बंधारा ओलांडून किनाऱ्यावरील घरांचा वेध घेऊ लागल्या. या बंधाऱ्याच्या दुरूस्तीसाठी महिला वर्ग, सहकारीसंस्था मागील दहा वर्षापासून प्रयत्न करीत आहेत. परंतु ठोस कारवाई होत नसल्याने अजून किती वर्षे मागण्या, आंदोलने, चर्चा, भेटी घेत बसायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.१९८० साली उभारला होता ‘सेतू’शासन व ग्रामस्थांच्या निधीतून गावामध्ये ट्रकच्या ट्रक पडलेल्या दगडांचा वापर करुन ते बंधाऱ्यावर रचण्यासाठी उपयोगात आणले गेले. याकामी महिला, पुरूष वर्गासह लहान लहान मुलेही जीव तोडून कामाला लागली होती. काही मच्छिमारांनी आपल्या होडीव्दारे लहान मोठे दगड समुद्रातून आणुन या बंधाऱ्यामध्ये ्नरचले होते. त्यामुळे शंकराच्या देवळाजवळ उत्तर-दक्षिण बंधारा उभारल्याने (सेतूच) त्याचा सकारात्मक बदल दिसून येत मच्छिमारांची गाळापासून सुटका झाली होती.चला उठा, जागे व्हा... : सातपाटी गावामध्ये श्रीराम मंदीरांच्या यात्रेमध्ये सर्वगाव एकत्र येतो. गावकरी सलग तीन दिवस सण साजरा करतात. साईबाबांच्या भंडाऱ्यासाठी १५ ते २० हजाराचा जमाव जमून बाबांचे गुणगान करतात. स्वाध्यायी गृप, समर्थ परीवाराच्या बैठकीतील सदस्य, स्वाध्यायी इ. सह अनेक पंथाचे अनुयायी हजारोच्या संख्येने एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी, शांततेसाठी प्रयत्न करीत असतात. मग आज समुद्रकिनाऱ्यालगत राहणाऱ्या मच्छिमारांच्या घरावर संकट आले असतांना शासन, आमदार, खासदार, ग्रामपंचायत यांच्या नावाने बोटेच काय मोडत बसलोय, आपलीही काही सामाजिक जबाबदारी नाही का? त्यामुळे चला उठा, जागे व्हा. सन १९८० साली आपल्या बाबांनी वरिष्ठांनी आपल्या गावाला दिलेला श्रमदानाचा वारसा आपण पुढे चालविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांच्या कानी या गोष्टी घालून अपात्कालीन फंडातून काही निधी मिळावा यासाठी प्रयत्न करतोय. - राजन मेहेर, अध्यक्ष,महाराष्ट्र मच्छिमार सेल.श्रमदानातून बंधाऱ्याच्या दुरूस्तीचा प्रस्तावही स्वागतार्ह बाब असून गावातून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करणार. - रमेश दवणे, अध्यक्ष-तंटामुक्त समिती.सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून श्रमदानाचा मिळालला वारसा पुढे नेण्यासाठी तरूणवर्ग नक्कीच उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवतील असा मला विश्वास आहे. - संजय तरे, माजी चेअरमन, सर्वोदय सहकारी संस्था.