नालासोपारा : नायगाव रेल्वे स्टेशन आणि जूचंद्र या दोन भागांना जोडणारा सोपारा खाडी पूलाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम लाल फितीच्या कारभारात अडकून पडले होते. अनेकदा आश्वासने देऊनही पूल खुला होत नसल्याने शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पीडब्ल्यूडी प्रशासनाने पुलाचे थातुरमातूर काम करून राजकीय पक्ष तथा नागरिकांची नाराजी दूर करण्याचे काम केले होते. मात्र त्यानंतरही पुलाच्या कामात काहीच सातत्य नव्हते. वसई-विरार शहर महानगरपालिकेने पुलाच्या कामासाठी १ कोटी १ लाख ७४ हजार रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी फक्त २० लाखांची रक्कम महापालिकेने पुलाच्या कामासाठी दिली आहे.मध्यंतरी सोपारा खाडी पुलाच्या बांधकामाला दिरंगाइ का होत आहे, याची विचारणा केली असता उपस्थित अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेकडून येणारा निधी मिळाला नसल्याने बांधकाम रखडल्याची धक्कादायक माहिती दिली होती. पुलाचे बांधकाम रखडले आहे म्हणून भरीव निधीची तरतूद करून देणाºया महापालिकेने केवळ फक्त २० लाखांची रक्कम देऊन उर्वरीत ८१ लाख ७४ हजार रूपयांची रक्कम थकवल्याने महापालिकेचा खरा चेहरादेखील समोर आला होता. पुलाच्या कामाला अंतिम स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी याआधीदेखील शिवसेनेने पीडब्ल्युडी प्रशासनाला घेरले होते. त्यात अधिकाऱ्यांनी २७ मे २०१९ पर्यंत पूल खुला करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र २७ म गेला तरी तसे घडलेले नाही.>लेखी आश्वासनामुळे शिवसेनेचे आंदोलन स्थगितयाच कालावधीत शिवसेनेचे ग्रामिण तालुका प्रमुख जगन्नाथ म्हात्रे यांनी पीडब्ल्यूडी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. २७ मे रोजी शिवसेना करत असलेल्या आंदोलनाची दखल घेत पीडब्ल्यूडी प्रशासनाने सोपारा खाडी पुल लवकरच खुला करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन शिवसेना पदाधिकाºयांना दिल्याने सेनेच्या दणक्याने पुलाचे काम मार्गी लागणार आहे. पीडब्ल्यूडी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शिवसेनेने सोमवारी छेडण्यात येत असलेले धरणे आंदोलन स्थगित केले आहे.>पुलाच्या संरचनेमुळे फेरबदल झाल्याने काम खोळंबलेनायगाव पूर्व-पश्चिम जोडणाºया रेल्वे उड्डाणपूलाचा पोहोचमार्ग येत असल्याने सा.बां. विभागास जूचंद्र बाजूकडील पोहोचमार्गाच्या आखणीमध्ये बदल करावा लागला आहे. त्याकरिता १०० मीटर लांबीचा पोहोचमार्ग व संरक्षण भिंत बांधण्याकरिता पालिकेकडून देण्यात येणारा १ कोटी १ लाख ७४ हजारांच्या निधीपैकी २० लाखांची गरज भासू लागली होती. पालिकेने पीडब्ल्यूडी प्रशासनाची ही गरज साांभाळून घेतली. मात्र त्यानंतर निधीची रक्कम देण्यास विलंब झाल्याने पुलाचे काम थंडावल्याचे निदर्शनास आलेहोते.
सोपारा खाडीपुलाचे काम सुरू, अनेक महिने ऐरणीवर आणला होता प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:58 PM