वसई : महापालिका निवडणुकीत यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार असून मागील वेळेच्या उलट आरक्षण स्थिती या वेळी आहे. यामुळे बविआला मोठी कसरत करावी लागेल, अशी स्थिती आहे. आरक्षण सोडतीत खुल्या गटासाठी ७४ जागा, तर एसटी-५, एससी- ५ आणि ओबीसीसाठी ३१ जागा अशा एकूण ११५ प्रभागांचे आरक्षण शुक्रवारी झालेल्या सोडतीत काढण्यात आले.या आरक्षण सोडत कार्यक्र माला जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. कैलास शिंदे, निवडणूक आयोगाचे पिठासीन अधिकारी जाधव, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले, उपसंचालक संजय जगताप, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड आदी पालिका व निवडणूक आयोगाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महापालिकेचे आरक्षण नियमाप्रमाणे व पारदर्शीपणे करण्यात आले आहे. आरक्षणाविषयी कोणाला आक्षेप असतील तर त्याविषयी २ ते ९ मार्च दरम्यान हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. १२ मार्चला या हरकतींचे विवरण राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने याप्रसंगी स्पष्ट केले.पालिकेतील पक्षीय बलाबलवसई-विरार महानगरपालिकेच्या आरक्षणाचा सर्वाधिक फटका सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या दिग्गज नगरसेवक मंडळींना बसला आहे. महापालिकेत ११५ पैकी बविआचे ११० नगरसेवक आहेत. उर्वरित ३ शिवसेना, १ भाजप व १ मनसे असे पक्षीय बलाबल आहे.
बविआला करावी लागणार कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:51 PM