वसई : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक पटकावल्यानंतर विरार का छोरा हे वाक्य पुन्हा एकदा सर्वांच्या चर्चेत आले आहे. पृथ्वीच्या रुपाने आणखी एका छोराने विरारचे नाव सगळ्या जगात रोशन केले आहे.हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरडुपर हिरो झाल्यानंतर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे दिग्गज नेते राम नाईक यांना पराभूत करणाºया गोविंदाची ओळख विरार का छोरा अशीच होती. यशाच्या शिखरावर असतानाच गोविंदाने राजकारणात उडी घेतली होती. गोविंदाची राजकीय कारकिर्द अल्पजीवी ठरली असली तरी त्याने त्याकाळी राम नाईक यांचा पराभव करुन जायंट किलर अशी प्रतिमा प्राप्त केली होती. या विजयानंतरही गोविंदा जसा निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी होऊ शकला नाही तसेच राम नाईक यांनाही पुन्हा निवडणुकीच्या राजकारणात यश मिळाले नाही. विरारमध्ये चिची या नावाने प्रचलित असलेला गोविंदा चित्रपटसृष्टीत आणि राजकारणात विरार का छोरा म्हणूनच ओळखला जायचा.गोविंदाप्रमाणेच पृथ्वी शॉचा जन्मही विरारचा. बालपणही विरारमध्ये गेले. नारंगी येथील परांजपे नगरात राहणाºया पृथ्वीचे तिसरीपर्यंतचे शिक्षण विरारच्या नॅशनल स्कूलमध्ये झाले.वयाच्या तिसºया वर्षापासून त्याला क्रिकेटने झपाटले होते. त्याला घडवण्याची महत्वपूर्ण कामगिरी गोल्डन स्टार क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी पार पाडली होती. विरारमध्येच पाया रचलेला पृथ्वी शॉ मुंबईच्या रिझवी स्प्रिंगफिल्ड स्कूलमध्ये दाखल झाला. तिथे १६ वर्षाखालील आंतरशालेय स्पर्धेत त्याने कर्णधारपद यशस्वीरित्या सांभाळले. त्यानंतर पृथ्वीची क्रिकेटमधील घोडदौड खºया अर्थाने सुरु झाली.एमआयजी क्लबकडून खेळतांना त्याला प्रशिक्षक राजीव पाठक यांच्याकडून मोलाच्या टिप्स मिळाल्या. नोव्हेंबर २०१३ मध्ये हॅरीश शिल्ड स्पर्धेत ५४८ धावांचा वैयक्तिक विक्रम करून पृथ्वीने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. पुढे रणजी क्रिकेट स्पर्धेत मुंबईकडून थेट उपांत्य फेरीत खेळण्याची संधी त्याला मिळाली. रणजीत चमकलेल्या पृथ्वीला १९ वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्याच्या नेतृत्वाखालील भारताने अंतिम फेरीपर्यंतचे सर्वच सामने एकतर्फी जिंकून विश्वचषकावर मोहोर उमटवली.कर्णधार म्हणून खेळतांना येणारे दडपण झुगारून त्याने भारतीय संघाचा पाया भक्कम करण्याची जबाबदारी लीलया पेलली. त्यामुळे सामना जिंकण्याचे दडपण सहकाºयांवर आले नाही.भारतीय संघात खेळण्याचे पृथ्वीचे स्वप्न आहे. भारतीय संघात येण्यासाठी असलेली मोठ्या खेळाडूंशी असलेल्या स्पर्धेची त्याला जाण आहे. पण, पृथ्वीने अगदी लहान वयात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. याच अफाट गुणवत्तेच्या जोरावर तो भारताचे नेतृत्व नक्कीच करील, असा विश्वास त्याचे विरारमधील प्रशिक्षक संतोष पिंगुळकर व्यक्त करतात.>आता लक्ष्य भारतीय संघातून खेळण्याचेभारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर विरार के छोरेने और एक कमाल किया या वाक्याची भर पडली. रिझवी स्कूल, हॅरीस शिल्ड, रणजी ट्रॉफी आणि १९ वर्षाखालील विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाºया पृथ्वी शॉला दिल्ली संघाने आयपीएलसाठी बुक केले आहे.
पृथ्वी शॉने जगभरात पुन्हा एकदा गाजविले विरारचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:33 AM