शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

यंदा बाप्पांचे आगमन लवकर, मात्र गणेशमूर्ती महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 1:57 AM

यंदा गणपती बाप्पांचे आगमन गतवर्षाच्या तुलनेत लवकर होणार असले तरी जीएसटी व महागाईमुळे बाप्पांच्या मूर्तीच्या किंमती चांगल्याच महागल्या आहेत.

विक्रमगड : यंदा गणपती बाप्पांचे आगमन गतवर्षाच्या तुलनेत लवकर होणार असले तरी जीएसटी व महागाईमुळे बाप्पांच्या मूर्तीच्या किंमती चांगल्याच महागल्या आहेत.महाराष्टÑाचे आराध्य दैवत म्हणजेच सर्वाचा लाडका गणपती बाप्पा़ यंदा गणरायाचे आगमन श्रावणानंतर लगेच होत असल्याने मूर्तीकारांच्या हाती खूप कमी वेळ शिल्लक राहीला आहे. त्यामुळे गणेश मूर्ती घडविण्याच्या कामांना वेग आला आहे. पावसाने उघडीप दिल्याने ठप्प झालेली रंगकामे जोमाने सुरू झाली आहेत. जूनच्या सुरुवातीला तर काहींनी मे़ महिन्या शेवटच्या आठवडयापासूनच गणेशमूर्ती कामांना सुरुवात केली आहे़ विक्रमगड तालुक्यातील व्यापारी बंधुच्या गणेश चित्रशाळेमध्ये ही कामे जोरदार सुरू आहेत. मात्र यंदा बाजारात अनेकांनी रेडीमेड गणेशमूर्ती विक्रीस आणल्या आहेत़या चित्रशाळांमध्ये गणेशाच्या विविध प्रकारातील सुंदर आणि आकर्षक अशा गणेशमूर्ती तयार केल्या जात असून त्या पाहाण्यासाठी व त्यांचे बुकींग करण्यासाठी गणेशभक्तांची व विशेष करुन शालेय विद्यार्थ्यांचीही गर्दी होत आहे़ विक्रमगडमधील काही चित्रशाळेत तयार मूर्ती आणून त्यांची रंगरंगोटी केली जाते तर काही मूर्ती स्वत: बनविल्या जातात त्यामध्ये शाडूच्या मातीच्या मूर्तीही बनविल्या जातात परंतु आताचे युग हे धावपळीचे व आधुनिक युग असल्याने प्लॅस्टर आॅफ पॅरीसची मूर्तींची मागणी जास्त असल्याचे येथील कारागीर सांगतात़तालुक्यातील जरी दिवसेंदिवस गणपत विक्री करणा-यांची संख्या वाढत असली तरी शहरातील जुने मूर्तीकार लक्ष्मण व्यापारी व त्याचा मुलगा एकनाथ यांनी सांगितले की, ग्राहकांच्या मागणी नुसार व त्यांच्या आवडी-निवडी नुसार गणेशमुर्ती तयार केल्या जात आहेत़ विक्रमगड तालुक्यातील अनेक ग्राहकांनी चित्रांप्रमाणे बसलेल्या गणेशमूर्तींची मागणी केली आहे़ त्यामुळे प्रत्येक ग्राहकांला आवडणा-या गणेशमूर्ती या शाळेमध्ये बनविल्या जातात़ परंतु शाडू मातीच्या मूर्तीची मागणी जरी कमी असली तरी त्यामूर्तीही बनविल्या जातात परंतु मातीच्या मूर्ती बनविण्यास त्या सुकण्यास व त्यांचे फिनिशिंग करण्यास खूप वेळ लागतो व तशा कुशल कारगीरांचीही आवश्यकता असते़ त्यामुळे सध्या या शाडूच्या मूर्ती आॅर्डर असेल तरच त्या बनविल्या जातात. मात्र प्लॅॅस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तींची मागणीही जास्त असून त्यांची आॅर्डर पूर्ण करण्यास काही अडचण नाही़ मात्र यंदा गेल्या वर्षीपेक्षा गणेशमुर्ती बनविण्याच्या साहित्यात, रंगांत दुपटटीने भाव वाढ झाल्याने मूर्तींच्या किंमतीही वाढलेल्या असतील़१९८४ मध्ये मातीची एक गोण ४ रुपये किंमतीला मिळत होती, ती आता १००० रुपयेपर्यत गेली आहे़ रंगाचे दर त्यावेळी १ रुपया ५० पैसे एक डबी होती ती आता १०० ते २०० रुपयाचे आसपास झाली आहे़ तर कारागीरही मिळत नसल्याने त्यांची मजुरी, वीज व साहित्यात झालेली महागाई त्यामुळे मूर्ती महागणार आहेत़परंतु महागाईचा कोणताही परिणाम गणेशमूर्ती खरेदीवर होत नसल्याचे त्यांनी सांगितले कारण बाप्पांचा उत्सव साजरा करताना भक्त पैशाची पर्वा करीत नाहीत.या चित्रशाळेत १००० हून अधिक मूर्ती बनविण्याचें काम सुरू आहे. त्यामध्ये शाडूच्या मूर्ती अवघ्या ५० ते ६० असतात मात्ऱ त्यांना विचारले असतांना ते म्हणतात की आम्ही या दमट वातारणामध्ये दिवसाला प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या २० ते २५ मूर्ती बनवू शकतो मात्र शाडूच्या मातीची एखाद दुसरीच मूर्ती बनेल. कारण एक तर शाडूची मूर्ती बनविण्याकरीता कसबी कारागीरांची आवश्यकता असते सध्या त्यांचीच कमतरता आहे़ या मूर्तीकरीता वेळही खूप लागतो व माती कल्याण शहरातून अगर अन्य ठिकाणाहून आणावी लागते तर महागाईमुळे ते शक्य होत नाही. या सगळ्याचा परीणाम शाडू मूर्तींच्या संख्या घटण्यात होतो.