राहुल वाडेकर / विक्रमगडमक्रर संक्रात अवघ्या एक दिवसांवर आल्याने वेगवेगळया आकारांची सुगडी ग्रामीण भागातीसह विक्रमगडच्या बाजारात दाखल झाली आहेत. तर संक्रांतीसाठी लागणाऱ्या सामग्रीने बाजार फुलून गेला आहे. सगळयांचा सण असलेल्या संक्रांतीवर यंदा महागाईचे सावट आहे. सुवासिनी आपल्या सौभाग्यांच रक्षण करण्यासाठी संक्रातीला एकमेकिंना हळदी कुंकवाचे वाण देतात, त्यासाठी लागणारी पाच सुगडे ६० रुपयांना तर मोठी ८० ते १०० रुपयांना मिळत आहे. दिवसेंदिवस महाग होत चालेली माती, ते बनविण्याची मजुरी, साहित्य, मेहनत वेळ आदी महाग झाल्याने त्याचा परिणाम सुगड्यांवरही झालेला आहे. संक्रातीचे सगळयात मोठे आकर्षण तीळगुळ असला तरी महिलांसाठी मात्र सुगडेच महत्वाचे असते. वाण देतांना त्यात हुरडा किंवा गव्हाच्या लोंब्या, बोर, गाजर, भुईमुगाच्या शेंगा अथवा तुरीच्या शेंगा, ऊसाच्या गंडेऱ्या, हिरवे हरबरे आदी घालून हे वाण देतात. त्यामुळे बाजारात सध्या या सामग्रीच्या खरेदीसाठी महिलावर्गाची धावपळ सुरु आहे.मकरसंक्रांत ही बहुधा १४ जानेवारीलाच येते सध्या डिसेंबरची थंडीची लाट सर्वत्र जानेवारीमध्ये पसलेली असल्याने या थंडीचा परिणाम होवून शेतातील गहू, हरभऱ्याची पिके तितक्यशा प्रमाणात अजून बहरलेली दिसत नाही, एकवेळ ऊस मिळतो आहे. बोरे मिळत आहेत. ओले हरभरे आणणार कुठून? असा प्रश्न आहे. गव्हाच्या लोंब्याही दुर्मिळ आहेत. काही व्यापाऱ्यांनी तर यंदा ऊस फारसा नाही म्हणून ऊसाच्या बांड्यांच्या गंडेऱ्या करून शास्त्रापुरता ऊस विकण्यास प्रारंभ केला आहे. बिचारे ग्राहकही नाईलाजाने तो खरेदी करीत आहेत. वस्त्रांच्या बाजारात मात्र पूर्वीच्या मानाने काळ्या वस्त्रांची मागणी घसरली आहे, कारण इतर वेळी या रंगाची वस्त्रे वापरली जात नाही, त्यामुळे फक्त संक्रातीसाठी ती घेणे अलिकडे टाळले जाऊ लागले आहे. अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.तीळगूळ, हलवा, गाजर सारेच झाले महागच्सुगड व त्यातील साहित्याप्रमणेच महिलांची गर्दी तीळ आणि गूळ खरेदीकरीता होत आहे. बाजारात गेल्यावर्षी तिळाचा भाव १०० रुपये किलो होता तर चिकीच्या गुळाचा भाव ५५ रुपये किलो होता. यंदा मात्र त्यामध्ये १५ ते २० टक्के वाढ झाल्याने त्याच्याही किंमती वाढल्या आहेत. तर आधुनिक युगात प्रत्येकाचे जीवन हे धकाधकीचे असल्याने अनेकांना तिळगूळ घरी करण्यासाठी पुरेसा वेळ नसलेल्या गृहीणींनी तयार लाडूवड्या घेण्याला प्राधान्य दिले आहे.च्दुकानात हे लाडू २०० जे ३०० रुपये किलो दराने विक्रीस आहेत. यंदाचा एक नंबरचा तिळ १२० तर चिक्की स्पेशल गूळ-७० रुपये, गाजर ४० ते ४५ रुपये किलोे भावाने विकले जात असतांनाही महागाईची तमा न बाळगता सण साजरा करण्याकरीता आवश्यक वस्तू खरेदीसाठी महिलांची गर्दी मात्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.यंदाची संक्रांत किती पक्ष्यांच्या जीवावर?डिसेंबर महिना संपला की अनेकांना वेड लागते ते पतंगांचे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आकाशात मोठया प्रमाणावर पतंग उडवतांना दिसून येतात. मकर संक्रातीला तिळगूळाबरोच पतंगांचेही महत्व आहे. विक्रमगडच्या बाजारात नानातऱ्हेचे पतंग, मांजा, फिरकी विक्रीसाठी दाखल झाले आहेत. परंतु हे पतंग उडविण्यासाठी वापरण्यांत येणारा चायनीज मांजा हा पक्ष्यांच्या जीवावर बेतणारा ठरतो. पतंग कापाकापीच्या स्पर्धेमध्ये आपण जिकांवे, या उद्देशाने अनेकजण धारदार मांज्याचा वापर करतात. या मांज्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून अनेक पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पक्ष्यांना इजा पोहविण्यचा कोणाचाही हेतू नसतो अगर कुणीही जाणून बुजून ते करीत नाही. परंतु पेच लावला की, आकाशात लांब गेलेल्या पतंगाच्या मांजामध्ये पक्षी अडकून त्यांना इजा होण्याचा संभव असतो. त्यामुळे यंदा पतंग उडवितांना जरा जपून असा सल्ला पक्षीमित्रांनी दिले आहे.अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या मकरसंक्रातीच्या निमीत्ताने बाजारात सध्या वेगवेळया रंगाच्या, आकाराचे पतंग दाखल झाले आहेत. ही मजा केवळ संक्रातीपुरती नसते. तर पतंगबाजांना दिवाळी नाताळ संपताच पतंग उडवायचे वेध लागतात. पूर्वी काच अथवा शिरस लावलेला दोरा मांजा म्हणून वापरला जायचा त्यासाठी खळ, शिजवलेला साबुदाणा वापरला जायचा परंतु चीनने प्लॅस्टिकने तयार केलेला व धातूंच्या बारीक भुकटीपासून तयार केलेला मांजा बाजारात आणला त्याची धार अधिक घातक आहे. तो घासला गेल्यास मानवापासून पक्षापर्यंत कुणीही कापला जाऊ शकतो. हा मांजा नष्ट पावत असल्याने तारा, झाडे, फांद्या, यावर तो अडकला की, वर्षानुवर्षे कायम राहतो व त्याच्या संपर्कात येणाऱ्या पक्षांना तो जल्लादा सारखे कापून टाकतो. त्यामुळे त्याच्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे. परंतु पतंगबाज मात्र तिला काही जुमानत नाहीत. त्यामुळे आता ही बंदी पोलिसांचा वापर करून अंमलात आणली जात आहे.
यंदा सुगड्यांवरही महागाईची संक्रांत
By admin | Published: January 13, 2017 5:47 AM