मनोर : मनोर ग्रामपंचायती अंतर्गत पाटीलपाड्याच्या पाणी पुरवठ्यासाठी बांधण्यात आलेली टाकी वर्षभरापासून वापर न झाल्याने पडून आहे. वरवर रंगरंगोटी झाली असली तरी तेथील महिलांना पाण्या साठी वणवण करावीे लागत आहे. लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या टाकी मध्ये पाणी येणार कधी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या पाटीलपाड्याची शंभर टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची असून त्यांना पाणी पुरवठा व्हावा म्हणून नळपाणी योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी ही टाकी बनविली आहे. मात्र. बांधल्यापासून तिच्यामध्ये पाणी सोडण्यासाठी पाईप लाईन चे काम अद्याप करण्यात आलेले नाही. रंगरंगोटी करून टाकी चे काम पूर्ण झाले आहे. मात्र, वर्ष झाले तरी तिचा लोकांना उपयोग झालेला नाही. आतातरी तिचा वापर लवकरात लवकर व्हावा अशी मागणी ग्रामस्थ परिसरातील नागरिक प्रशासनाकडे करीत आहेत.(वार्ताहर)शासनाकडून निधी रखडलाग्रामपंचायतीचे नवनियुक्त सरपंच, उप सरपंच व सदस्यांनी ही परिस्थिती बदलावी अशी मागणी होत आहे. मार्चपासूनच पाणी टंचाईचे चटके बसू लागल्याने पाटीलपाड्यासाठी पाणी हा गंभिर विषय बनला आहे. यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाचे अभियंते एस. तंबूलकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शासनाकडून निधी येणे बाकी आहे. तरी ठेकेदाराशी बोलून लवकरात लवकर पाईप लाईन टाकून पाणी पुरवठा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
वर्षभरापासून पाण्याची टाकी धूळ खात
By admin | Published: March 30, 2017 5:19 AM