जव्हार : येथील आदीवासी विद्यार्थीनींना स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्याशी संचालक व दोन शिक्षकांनी लैंगिकचाळे करण्याची संतापजनक घटना ज्या जुन्नर तालुक्यातील येनेरे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये घडली. त्या शाळेला प्रकल्प कार्यालयाने काळ्या यादीत टाकले असून याशाळेत शिक्षण घेणाºया अडीचशे विद्यार्थ्यांना तातडीने पर्यायी शाळांमध्ये अॅडमीशन मिळवून देण्यात आली आहे. संस्थापक सचिन घोगरे व त्यांचे साथीदार शिक्षक यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान येनेरे इंग्लीश मिडीयम शाळेत जव्हार प्रकल्पातील एकूण २५० विद्यार्थी शिक्षण घेत असुन आणखी मुलींचे विनंयभंग झाल्याचा संशय पालक व्यक्त करीत असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी येथील पालकांनी केली आहे. तसेच अप्पर आयुक्त, डांगे व जव्हार प्रकल्प अधिकारी पवनीत कौर यांनी घटनेच्या दुसºया दिवशीच ही शाळा गाठली व परिस्थिती बघून शाळेचे विद्यार्थी तेथून दुसºया शाळेत हलविले तसेच या शाळेला काळ्या यादीत टाकले आहे.अशा शाळांची निवड ठाणे येथील अप्पर आयुक्तांच्या कार्यालयातील निवड समितीद्वारे होते. या निवडीत मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार होत असून या योजनेत अनेक बोगस शाळा निवडल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकाºयांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आहे. आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाºया आश्रमशाळा व कल्याणकारी योजनांतर्गत अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून शासनाने सन २००९ साली इंग्रजी माध्यमशाळेत पहिली ते बारावीपर्यत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यम निवासी शाळांत प्रवेश देण्याची योजना अमलांत आणली होती.या करीता प्रत्येक विद्यार्थ्यांमागे शाळांच्या दर्जा नुसार ५० हजार ते ८० हजार रुपयांचा वार्षिक खर्च शासन करीत असते. या सर्व प्रक्रियेत सचिव, आदिवासी विकास विभाग, महाराष्टÑ राज्य, आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशीक, अप्पर आयुक्त, ठाणे, नाशीक, अमरावती व नागपूर तसेच अप्पर आयुक्त यांच्या अंतर्गत येणारे ११ प्रकल्प कार्यालय त्या अंतर्गत येणारे लाभार्थी यांचा समावेश असतो. शाळांची निवडही अप्पर आयुक्त कार्यालय करते. मागील काही वर्षापासुन पांचगणी व इतर इंग्रजी माध्यम शाळेच्या विविध प्रकारच्या घटना घडल्या आहेत, यामध्ये प्रामुख्याने या विद्यार्थ्यांना राहण्याची चांगली सोय शाळा करून देत नाही, तसेच जेवण चांगले दिली जात नाही, अभ्यासही चांगला करून घेतला जात नाही, फक्त शासनाच्या पैश्यांवर डोळा अशी तºहा या नामांकीत शाळांची असून याबाबतही जव्हार प्रकल्पात कित्येक वेळा पालकांनी प्रकल्प कार्यालयात मोर्चा आणून समस्या मांडल्या आहेत५७८ विद्यार्थ्यांचे पालक झालेत चिंताक्रांतअर्जांची छाननी करून अप्पर आयुक्त, कार्यालय ठाणे यांनी जव्हार प्रकल्पाकरीता अघई-१५० विद्यार्थी, अंभई-५० विद्यार्थी, येरले (सांगली)-४८ विद्यार्थी, दौड-४४ विद्यार्थी तर उस्मानाबाद येथे - ३६ विद्यार्थी या शाळा निवडून प्रकल्प कार्यालयाने त्यांत पाठविले आहेत.येनेरे इंग्लीश मिडीयम शाळेत जव्हार प्रकल्पातील २५० विद्यार्थी गेल्या ३ वर्षापासून असून, यात अजून किती विद्यार्थ्यांचे शोषण झाले असेल असा प्रश्न पालकांना पडला आहे.
येनेरे स्कूल काळ्या यादीत, विद्यार्थ्यांचे होणार समायोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 6:26 AM