वसई - वसई पश्चिमेस माणिकपूर नाक्यावर बसिन पेट्रोलपंपावर भीषण राडा झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान शुक्रवारी रात्रीच्या सुमारास मास्क नसल्यामुळे पेट्रोल देण्यास पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांनी नकार देताच संतप्त झालेल्या तरुणांनी या पेट्रोलपंपावर येऊन तोडफोड केली. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सहभागी आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती माणिकपूर पोलिसांनी लोकमतला दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेकडील माणिकपूर येथील बसिन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी विना मास्क आलेल्या काही तरुणांनी येथील पंपाची अक्षरशः तोडफोड करत कर्मचाऱ्यांना व खास करून एका महिला कर्मचारीला देखील कानशिलात लगावत मारहाण केली.
शुक्रवारी रात्री 8 ते 8.30 वाजताच्या सुमारास नालासोपारा येथे राहणारे १० ते १२ तरुण दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले होते.दरम्यान या तरुणांनी मास्क न लावल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्याना पेट्रोल देण्यास नकार दिला व आपण बाजुला जा असे सांगितले असता या गोष्टीच्या रागातून तरुणांनी पंपावर तुफान राडा घातला.
तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
कर्मचाऱ्यांना मारहाण करून पंपावरील सामानाची आणि फिलिंग मशीनची तोडफोड केली. हा सर्व प्रकार पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणिकपूर पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
बलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय
मोठी कारवाई! अल-कायदाच्या 9 दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवण्याचा होता कट
कुत्र्यावरून दोन गटात तुफान 'राडा', अनेकजण जखमी; गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
मनसे आणि शिवसेना संघर्ष पुन्हा पेटणार; ठाणेकरांना दिलेली आश्वासन पूर्ण करा अन्यथा...