लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. दरम्यान प्रत्येकाच्या हाती इंटरनेट पोहचल्याने मोबाईलद्वारे निकाल पाहण्याला सर्वाधिक पसंती देणात आली. त्यामुळे साबरकॅफेतील गर्दी या वेळी ओसरलेली दिसली. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पाहण्यासाठी सात संकेतस्थळांची माहिती देण्यात आली होती. शिवाय मोबाईल फोनद्वारे एसएमएस सुविधाही पुरविण्यात आली होती. ग्रामीण भागापर्यंत मोबाईलसह इंटरनेट क्र ांती पोहचल्याने डहाणू तालुक्यातील आदिवासी पाद्यावरील विद्यार्थ्यांनेही निकालाची माहिती घरबसल्या घेतली. तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता किंवा आत्महत्येपासून परावृत्त व्हावे या करिता व्हाट्सअप या तंत्राच्या माध्यमातून धीर देण्याचे काम दोन दिवसांपूर्वी पासून नातेवाईक, मित्रमंडळी यांनी सुरू केले होते.बोर्डीतील पिरोजशहा गोदरेज कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान व वाणज्यि शाखेचा निकाल अनुक्रमे ९८.८६ टक्के व ९४.२५ टक्के, आचार्य भिसे शिक्षण संस्था बोरिगाव कला ९०.१४, तसेच वाणज्यि शाखेचा निकाल ८९.७० टक्के. कासा येथील पूज्य आचार्य भिसे कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेचा निकाल ९६.९३ टक्के तर पारनाका येथील बाबुभाई पोंदा ज्युनिअर कॉलेजातील कला ८८.९२ टक्के, वाणज्यि ९७.७८ टक्के, टेक्निकल ९०.२४ टक्के निकाल इतका लागला आहे. लवकरच कनिष्ठ महाविद्यालयांकडून निकालाची प्रत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे जमा करण्यात येईल, त्यानंतर बारावी निकालाचा लेखाजोखा समोर येईल अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल सोनार यांनी दिली.
मोबाईलद्वारे निकाल पाहण्याला युवांची पसंती
By admin | Published: May 31, 2017 5:27 AM