- अनिरु द्ध पाटीलबोर्डी - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या दिवसागणिक कमी होत आहे. जे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्या मध्ये केवळ ८० ते ९० टक्के विद्यार्थी आदिवासी असतात. त्यामुळे या शाळा केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच उरल्या आहेत. या तालुक्यात २६ केंद्र असून जिल्हा परिषदेच्या ४६२ शाळा आहेत. त्या पैकी कमी पटसंख्येमुळे अनेक शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.शहारांप्रमाणेच खेडेगावातही कमी पटसंख्येमुळे जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद पडण्यास सुरु वात झाली आहे. ज्या सुरु आहेत. त्या मधील बहुसंख्य विद्यार्थी हे आदिवासी आहेत. बंदरपट्टीतील गावांमध्ये विविध जाती-धर्माचे लोक राहतात. परंतु येथील पालकांचा पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाठवण्याचा कल वाढला आहे. या शाळेत पाठविल्याने सामाजिक दर्जा वाढतो असा त्यांचा समज आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नरपड शाळेत पहिली ते चौथीचे वर्ग असून एकूण ८६ चा पट आहे. मात्र १९०६ साली स्थापन झालेल्या या शाळेत तीन विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थी आदिवासी व माह्यावंशी समाजातील आहेत.या गावची लोकसंख्या सुमारे सात हजार असून वाढवळ, मांगेला, भंडारी, ख्रिस्ती आदी बिगर आदिवासी समुदाय राहतात. मात्र पाल्याला जि. प. च्या शाळेतील शिक्षण द्यायला एकही ग्रामस्थ तयार नाही. हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने अन्य गावातही दिसून येते. त्यामुळे आगामी काळात मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांनाही कमी पटसंख्येचा फटका बसणार आहे. त्यामुळे आदीवासी विद्यार्थी शिक्षणाला मुकण्याची शक्यता आहे.शासकीय कर्मचाºयांची मुलेच इंग्रजी शाळेतया शाळा शहरी भागात असून प्रवेश व मासिक फी, प्रवासभाडे, गणवेश आणि खाजगी शिकवणीकरीता खूप मोठी रक्कम मोजत आहेत. बहुतेक शासकीय अधिकारी व कर्मचारी पाल्याला जिल्हा परिषद शाळेत पाठवत नाहीत. त्या मध्ये माध्यमिक आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा समावेश आहे.
जि.प. शाळेत फक्त आदिवासी विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 6:38 AM