पालघर : ग्रामविकास विभागाच्या शिक्षक बदल्या संदर्भातील जी. आर. नूसार पालघर जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रि या पार पडली. बदली प्रक्रि या होऊन दोन महिने उलटून गेल्या नंतरही बदली झालेल्या शिक्षकांना आजही कार्यमुक्त न केल्यामुळे तसेच ह्यातील काही बदल्या ‘अर्थकारणाच्या चक्रव्यूहात’ अडकल्यामुळे शिक्षक संतप्त झाले आहेत. प्रशासनाच्या ह्या अन्यायकारक धोरणाविरोधात पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक परिषद व म.रा.जुनी पेन्शन हक्क संघटना या संघटना उद्या (शनिवारी) जिल्हा परिषदेवर मोर्चा आंदोलन करणार आहेत.दोन महिन्यापुर्वी पालघर जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रि या आॅनलाईन पद्धतीने पार पडून यामध्ये इतर जिल्ह्यातील २२९ शिक्षकांची आॅनलाईन बदली झाली. ह्या शिक्षकांच्या बदल्या करताना सर्वांच्या कागदपत्रांची पडताळणीही पार पडली. तरीही आजतागायत त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. पालघर जिल्ह्यात शिक्षकांची संख्या कमी असल्याचे कारण देऊन प्रशासन व राजकीय पदाधिकाºयांनी त्यांना कार्यमुक्त करण्यास विरोध केल्याचे कळते. परंतु ४९ शिक्षक जिल्हा बदलीने व ७० शिक्षक समुपदेशनाने असे एकुण १२० शिक्षक जिल्ह्यात हजर झाले आहेत. तरीही आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश मिळालेले नाहीत. यामागे आर्थिक हितसंबंध लपले असण्याची शक्यता शिक्षकांनी व्यक्त केली आहे. जिपच्या शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याच्या तक्र ारी असून अश्या प्रकरणामुळे ह्याला दुजोरा मिळत असल्याचेही बोलले जाते.आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या जागा रिक्त दाखिवण्यात आल्या आहेत. जिल्हांतर्गत बदली प्रक्रि या सुरु आहे. जर या रिक्त जागेवर जिल्हांतर्गत बदली झालेले शिक्षक आले तर पुन्हा वेतन काढण्याचा पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. यामुळे हे शिक्षक सध्या प्रचंड मानिसक तणावाखाली काम करत आहेत. अशाने विद्यार्थांच्या गुणवत्तेवरही परिणाम होणार आहे.स्वत:च्या जिल्ह्यात बदली झाली म्हणून अनेक शिक्षकांनी नातेवाईक व इतरांकडून उसनवारी करु न पतपेढी व इतर बँकाचे घेतलेले कर्ज चुकते केल्याने त्याच्यावर आर्थिक संकट ओढलं आहे. काही शिक्षकांनी तर आपल्या कुटुंब कबिल्याची रवानगी सुद्धा केली आहे. शिक्षकांनी स्वत:च्या गावी जायची तयारी करून कार्यमुक्ती आदेशाची वाट पाहत बसले असताना तो आदेश आर्थिक वाट्याच्या गर्तेत अडकला असल्याचे कळते.अनेक वेळा अर्ज विनंत्या करु नही आदेश मिळत नसल्याने जि.प.च्या अन्यायकारी धोरणा विरोधात शिक्षक उद्या जिल्हा परिषदे समोर आंदोलन पुकारणार आहेत. 30 सप्टें.च्या आगोदर कार्यमुक्त न केल्यास बेमुदत उपोषन करण्याची भुमिका शिक्षकांनी घेतली आहे.आमच्यावर मनोरुग्ण होण्याची वेळदोन महिने उलटून गेल्यावरही कार्यमुक्तीचा आदेश मिळत नाही. यामुळे शिक्षकांची कुचंबना होत असून प्रशासनाने आमच्यावर मनोरु ग्ण होण्याची वेळ आणली आहे. आम्हाला कार्यमुक्त करा, आमची लेकरं बाळ आमची वाट पाहत आहेत. - गुरु नाथ बिडकर, शिक्षक
जि.प. शिक्षकांचा आज मोर्चा, ‘अर्थकारणाचे चक्रव्यूह’?, बदली प्रक्रिया होऊनही कार्यमुक्ती होत नसल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 5:37 AM