वाशिम जिल्ह्याची लाेकसंख्या १३ लाख ६० हजार २१६ इतकी आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत (मंगळवार संध्याकाळपर्यंत) ७,२४२ काेराेना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. लाेकसंख्येनुसार १८८ नागरिकांमागे १ काेराेना बाधित असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात काेराेनामुळे एकूण १५५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील काेराेना बाधितांचा समावेश आहे, तर इतर जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाला, जे जिल्ह्यातील रहिवासी हाेते. असे एकूण जिल्ह्यातील १६० जणांचा काेराेनाने मृत्यू झाल्याची नाेंद आराेग्य दप्तरी दिसून येत आहे. जिल्ह्यात बाधित हाेणाऱ्यांची संख्या व काेराेनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत जास्त फरक दिसून येत नाही.
--------------
मानाेरा तालुक्यात सर्वात कमी मृत्यू
जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असताना मानाेरा तालुक्यात सर्वात कमी रुग्ण व मृत्यू दिसून येतात. वाशिम तालुक्यात ५४, कारंजा ३२, रिसाेड २४, तर मालेगाव, मंगरूळपीर तालुक्यात प्रत्येकी २३ काेराेनामुळे मृत्यू झाले आहेत. यामध्ये मानाेरा तालुक्यात केवळ ४ मृत्यूची नाेंद आहे.