जिल्ह्यातील सहाही तालुक्यांची एकूण लोकसंख्या १३ लाख ७४ हजार ७३५ असून त्यातील १० लाख १३ हजार १८० जण कोरोना लसीकरणासाठी पात्र आहेत. त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ४ लाख लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे हे प्रमाण मात्र केवळ दीड लाख असून मुदत संपूनही अद्यापपर्यंत १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
.................
दुसऱ्या डोससाठीची मुदत
कोविशिल्ड - ८४ दिवस
कोव्हॅक्सिन - २८ दिवस
..............
दुसऱ्या डोसचा पडला विसर
कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकांनी ठरावीक अंतराने दुसरा डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित करून घेतले; मात्र १० हजारांपेक्षा अधिक नागरिकांना दुसरा डोस घेण्याचा विसर पडला. मुदत उलटल्याने आता अडचणीत भर पडली आहे.
............
जिल्ह्यात झालेले लसीकरण
पहिला डोस - ४ लाख
दुसरा डोस - १.५ लाख
.............
कोट :
जिल्ह्यात कोरोना लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे; मात्र ठरावीक अंतराने दुसरा डोस घेणे आवश्यक असताना अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आरोग्य विभागाकडून यासंबंधी वेळोवेळी आवाहन केले जात आहे; परंतु त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
- विपुल चांडे, जिल्हा समन्वयक, लसीकरण मोहीम