लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड (वाशिम): कारंजा येथील श्री नृसिंह महाराज गुरूमंदीर संस्थान यांच्या कडे सांगली व कोल्हापुर येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ११ लाख रूपयांचा धनादेश वाशिम जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांच्याकडे ५ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला.कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातले असून, या नैसर्गिक आपत्तीचा फटका लाखो कुटंूबांना बसला आहे. अशा आपत्तीजनक स्थितीत राज्यभरातून पूरपिडितांसाठी मदतीचा ओघ सुरू आहेत. त्यात कारंजा येथील गुरु मंदीर संस्थाननेही पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी ११ लाख रुपयांचा निधी दिला आहे. जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी गुरुवारी कारंजा तील श्री गुरूमंदीर संस्थानला भेट दिली. त्यावेळी गुरुमंदिरच्या विश्वस्तांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे दिला. यावेळी गुरु मंदीर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण खेडकर, विश्वस्त वसंत सस्तकर, दिंगबर बरडे, विनायकराव सोनटक्के, प्रकाशराव घुडे, अॅड अभय पारसकर यांच्यासह कारंजाचे उपविभागीय अधिकारी अनुप खांडे यांची उपस्थिती होती.
कारंजा गुरूमंदीर विश्वस्तांकडून पूरग्रस्तांसाठी ११ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 4:40 PM