०००
रोजगार सेवकांचे मानधन अनियमित !
वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत रोहयोच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना दरमहा पहिल्या आठवड्यात मानधन मिळत नाही. गत दोन महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने ग्रामरोजगार सेवकांमधून रोष व्यक्त होत आहे.
०००
मोफत प्रवेश प्रक्रिया लांबणीवर !
वाशिम : आरटीईअंतर्गत पहिल्या लॉटरीमध्ये जिल्ह्यातील ६५० बालकांची मोफत प्रवेशासाठी निवड झाली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षण विभागाच्या पुढील सूचनेनुसार पालकांना पडताळणी समितीकडे जाता येणार आहे.
००००
८५ जणांवर दंडात्मक कारवाई
वाशिम : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ८५ जणांवर वाशिम शहर वाहतूक शाखेने गुरुवारी पाटणी चौक, पोलीस स्टेशन चौक, पुसद नाका येथे कारवाई केली.
०००००
आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
वाशिम : कोरोना चाचण्या, लसीकरण मोहीम, आदी मुद्द्याच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी आरोग्य विभागाचा ऑनलाईन पद्धतीने आढावा घेतला.