वाशिम : कारंजा तालुक्यातील वाघोळा येथील एका ११ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना१७ ऑक्टोबरला उघडकीस आली. त्याचा मृतदेह अडाण धरण पात्रातील पाण्यावर तरंगताना आढळून आला.
हा मुलगा सोमवार १६ ऑक्टोंबरच्या सकाळी १० वाजता पासून बेपत्ता होता. शेख साहिल शेख निसार असे या मुलाचे नाव असून तो कारंजा तालुक्यातील वाघोळा येथील रहिवासी असल्याची आणि आणि वाघोळा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत इयत्ता सहावीत शिकत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान सदर मृतक मुलगा घराबाहेर पडला परंतु त्यानंतर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी इतरत्र शोधाशोध केली मात्र तो आढळून आला नाही. अखेर मंगळवारी पहाटे त्याचा मृतदेह अडाण धरण पात्रातील पाण्यावर तरंगताना आढळून आला.
या घटनेची माहिती ग्रामीण पोलीसाना देण्यात आल्यानंतर सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या रामदास पारधी, योगेश अंभोरे ,समीर शहा व अजय ढोक यांनी सासचे अध्यक्ष शाम सवाई यांच्या मार्गदर्शनात मृतदेह पाण्याबाहेर काढून रुग्णवाहिका चालक दीपक सोनवणे यांनी शवविच्छेदनासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणला. परंतु तो अडान धरण पात्रात कसा पोहोचला आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचे नेमके कारण पाेलीस शाेधत असून सदर घटनेबाबत कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.