वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तुलनेने अधिक तीव्र स्वरूपाची ठरली. त्यात प्रशासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिलांसह घरातच अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या महिलाही संसर्गाच्या शिकार झाल्या. विशेषत: कोरोनाच्या ११ महिन्यांच्या पहिल्या लाटेत २८१७ महिला बाधित झाल्या होत्या. दुसऱ्या लाटेतील चारच महिन्यांत हा आकडा ११ हजारांवर पोहोचला. त्यातील शंभरापेक्षा अधिक महिलांचा संसर्गाने मृत्यूदेखील झाला.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या लाटेचा कालावधी एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ हा गृहीत धरला जात असून त्यानंतर संसर्गाची दुसरी लाट आल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पहिल्या लाटेत जिल्ह्यातील एकूण ७ हजार ४३० जण बाधित झाले होते. त्यात महिला बाधितांची संख्या केवळ २ हजार ८१७ होती; तर दुसऱ्या लाटेत एकूण ३३ हजार ३१३ जण बाधित झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली असून महिला बाधितांचा आकडा ११ हजारांपेक्षा अधिक झालेला आहे.
७,४३०पहिल्या लाटेत एकूण बाधित२,८७०महिला बाधितांची संख्या३३,३१३दुसऱ्या लाटेत एकूण बाधित११,१२२महिला बाधितांची संख्या