लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) - मालेगाव तहसिल येथे शुक्रवारी पार पडलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत एकूण १११ प्रकरणे मंजूर झाली आहेत, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मारोतराव लादे यांनी दिली.संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी प्रस्ताव मागविले जातात. या प्रस्तावांची छानणी संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेत केली जाते. शासकीय नियमात बसणाºया परिपूर्ण प्रस्तावांना या समितीच्यावतीने मंजूरी दिली जाते. या सभेत एकूण १३८ प्रकरणे मंजूरीसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी पात्र व परिपूर्ण असणाºया १११ प्रकरणांना मंजूरी देण्यात आली. यामध्ये दिव्यांग १५, विधवा १८, परित्यक्त्या ३, श्रावण बाळ वृद्धापकाळ ७५ अशा प्रकरणाचां समावेश आहे. तर परित्यक्त्या एक आणि श्रावण बाळ वृद्धापकाळची २६ अशी एकूण २७ प्रकरणे त्रूटीत निघाली. ज्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत, त्यांनी कागदपत्रांची पुर्तता करून प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन समितीच्यातीने करण्यात आले. पुढील सभा ६ आॅक्टोबर रोजी असून, २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. सभेला तहसिलदार राजेश वजिरे, समितीचे अध्यक्ष मारोतराव लादे, समिती सदस्य अमोल माकोडे , संगीता राउत, नितिन काळे, दीपक दहात्रे, संजय केकन, सुनील घुगे, ज्ञानेश्वर मुंढे, साहेबराव नवघरे, डॉ गजानन ढवळे आदींसह एस.ए.ठोकळ, सी.बी.इंगोले, काळसरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजना समिती सभेत १११ प्रकरणे मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 6:10 PM