शालेय शिक्षण विभागाच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत नोंदणीसाठी शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शिक्षण विभागाने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिलेली होती. ही वाढीव मुदत मंगळवार२४ फेब्रुवारीला संपली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील१०३ शाळांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील १६, मालेगाव तालुक्यातील १७, मंगरुळपीर तालुक्यातील १७, मानोरा तालुक्यातील ७, रिसोड तालुक्यातील १८, तर वाशिम तालुक्यातील २८ शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांत मिळून २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत ७१८ जागा भरावयाच्या आहेत. या जागांकरीता ऑनलाईन अर्ज क रण्यासाठी ३ मार्चपासून सुरुवात झाली आहेत. या अर्ज प्रक्रियेसाठी ३० मार्च २०२१ ही अंतीम मुदत देण्यात आली होती. या मुदतीपर्यंत ११२३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले आहेत.
------------
आता लक्ष लॉटरी प्रक्रियेकडे
२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील १०३ शाळांची नोंदणी झाली असून, या शाळांत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ३० मार्च रोजीच्या अंतीम मुदतीपर्यंत ११२३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज सादर केले असून, आता या प्रवेश प्रक्रियेत निवडीसाठी होणाºया लॉटरी प्रक्रियेकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
------------
कोट: आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतंर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रि येस बुधवार ३ मार्चपासून सुरुवात झाली होती. या अर्ज प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या ३० मार्च रोजीच्या अंतिम मुदतीपर्यंत ११२३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरीता पालकांनी अर्ज केले आहेत.
- अंबादास मानकर,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. वाशिम