लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पोलीस विभागात कार्यरत जिल्ह्यातील ११४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय ऐच्छिक बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी २८ मे रोजी केल्या. वाशिम जिल्ह्यातील १३ पोलीस स्टेशन, जिल्हा वाहतूक शाखा, शहर वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, महिला तक्रार निवारण, जिल्हा विशेष शाखा, वाचक शाखा, पोलीस मुख्यालय, नियंत्रण कक्ष, फिंगर प्रिंट आदी शाखांमधील ११४ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या (पाच वर्षे सेवा दिलेल्या) २८ मे रोजी करण्यात आल्या. वाशिम पोलीस मुख्यालयातील सभागृहामध्ये प्रशासकीय बदलीसाठी पात्र पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा २७ मे रोजी पोलीस अधीक्षक पाटील यांनी अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये खुला दरबार घेतला. त्यात पात्र बदलीधारकांना आपल्या अडीअडचणी मांडून तुम्हाला कुठे व का जाण्याची आवश्यकता आहे, याबाबत जाणून घेण्यात आले. बदलीसाठी पात्र असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या ‘आवडी’नुसार ‘इन कॅमेरा’ बदली प्रक्रिया राबविण्यात आली. काही कर्मचाऱ्यांची नाराजी सोडल्यास ९५ टक्के बदल्या समाधानकारक झाल्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रशासकीय बदलीसंदर्भात पोलिसांना वाशिम जिल्ह्यात एवढी पारदर्शकता पहिल्यांदाच बघावयास मिळाल्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेचे स्वागत होत आहे.
११४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
By admin | Published: May 29, 2017 1:19 AM