वाशिम, दि. २३- ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, सोबतच त्यांचे जीवनमान उंचावून त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पातून महिला बचत गटास शेळीपालनासाठी १.१५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला.केकतउमरा येथे रविवार, २३ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात ३0 टक्के अनुदानावर तीन विधवा आणि गरजू महिलांना विनामूल्य ह्यअल्ट्रा पोलह्णच्या माध्यमातून शेळीपालनाकरिता १.१५ लाख रुपयांचा निधी वाटप करण्यात आला. शेळीपालनाकरिता मिळालेल्या १.१५ लाख रुपये अनुदानातून व्यवसाय उभारून सक्षम होण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करू, असे लाभार्थी महिलांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास केकतउमरा येथील सरपंच उत्तमराव पायघन, समृद्धी ग्रामविकास समितीचे सचिव प्रवीण पट्टेबहादूर, जिल्हा व्यवस्थापक एस. एन. ढवळे रमेश बादाडे, मदन श्रीखंडे, संदीप बकाल, आर. पी. तायडे, काळे, कृषी समृद्धी ग्रामविकास समितीचे अध्यक्ष गजानन घोडे आदींची उपस्थिती होती.
शेळीपालनासाठी १.१५ लाखांचा निधी!
By admin | Published: October 24, 2016 2:30 AM