शिरपूर जैन : येथे मंगळवारी रात्री जोरदार पाऊस पडला असून २९ मे पासून ११५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे परिसरात हळद लागवडीला गती प्राप्त झाली आहे.आता सोयाबीन,तूर, उडीद,मूग पेरणीसाठी शेतकरी राजा सज्ज झाला असून गुरुवारपासून पेरणीला निश्चित सुरुवात करणार असल्याचे चित्र आहे.
शिरपूर परिसरात २९ मे पासून जवळपास तीन वेळा जोरदार पाऊस पडला. २९ मे शनिवारी ४१ मिलीमीटर पाऊस पडला. त्यानंतर ३ जून गुरुवार रोजी ६ मिलिमीटर तर रविवार ६ जूनला सायंकाळी ३१ मिलीमीटर , मंगळवारी रात्री ३७ मिलीमीटर इतका पाऊस पडला .मागील दहा दिवसात ११५ मिलिमीटर पाऊस पडल्याने हळद लागवड गतीने सुरू आहे. आता शेतकरी राजा पेरणीसाठी सज्ज झाला आहे. सोयाबीन,तूर, मूग, उडीद पेरणीला गुरुवारपासून सुरुवात करणार आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी शेती मशागतीचे कामे पूर्ण केली आहे.तसेच बी बियाणे, रासायनिक खतांची जुळवाजुळव करून ठेवली आहे .शिरपूर परिसरात यावर्षी हळद लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली असली तरी मुख्य पीक सोयाबीन असणार आहे.