शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

लोकन्यायालयात ११८९ प्रकरणे निकाली, ४.६१ कोटींची तडजोड; दोन प्रकरणात पती-पत्नी संसार पुन्हा जुळला

By दिनेश पठाडे | Published: December 09, 2023 8:11 PM

एकाच दिवशी ११८९ प्रकरणांचा निपटारा झाला असून ४ कोटी ६१ लाख १० हजार ९१८ रुपयांची तडजोड झाली आहे.

वाशिम : जिल्हा व तालुका न्यायालयात ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकाच दिवशी ११८९ प्रकरणांचा निपटारा झाला असून ४ कोटी ६१ लाख १० हजार ९१८ रुपयांची तडजोड झाली आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेलया निर्देशानुसार शनिवारी जिल्ह्यातील सर्व तालुका तसेच जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या कएूण १००६ प्रकरणांचा तसेच दाखलपूर्व १८३ प्रकरणे असे एकूण ११८९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तर साडेचार कोटींवर रकमेचे प्रकरणे निकाली निघाली.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी व सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष आर.पी.पांडे, दिवाणी न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे सचिव व्ही.ए.टेकवाणी यांनी विविध पॅनलला भेट देऊन माहिती घेतली. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा, तालुका  वकील संघ, जिल्हा पोलिस दल, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

विभक्त राहत असलेले पती-पत्नी पुन्हा एकत्र पती-पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला की ते नाते तुटण्याच्या दिशेने जाते. आणि न्यायालयात जाऊन नाते संपुष्टात आणले जाते. मात्र लग्नाची ही नाती संपुष्टात येऊ न येत म्हणून न्यायालयही शेवटच्या क्षणापर्यंत आटोकाट प्रयत्न करीत असते. शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात विभक्त राहत असलेल्या दोन वैवाहिक वादाच्या प्रकरणांमध्ये निलेश व वनिता आणि सुनिल व अनुसया ह्या  पती-पत्नी यांच्या मध्ये प्रेमाचा समेट घडवून आणल्यामुळे त्यांनी एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला. जिल्हा न्यायाधीश पी.आर. पांडे यांच्याहस्ते पती-पत्नीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Courtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदार