कोरोना रुग्णांचा जिल्ह्यात उद्रेक झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण ग्रामीण व खेडे विभागात निष्पन्न होत आहे. शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोवर्धना, शेलगाव बोंदाडे, नेतंसा या लहान गावांमध्ये विक्रमी रुग्ण असल्याचे निदान झाले. हळूहळू केनवड, शिरपूर यासारख्या ग्रामीण ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहे. शिरपूर जैन येथे ९ एप्रिल ते २१ एप्रिल या काळात ७० जण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. अशा प्रकारे दाट लोकवस्ती असलेल्या शिरपूरसारख्या ठिकाणी हळूहळू कोरोना रुग्ण वाढणे हे संपूर्ण शिरपूर गावासाठी धोकादायक आहे. जवळपास २५ हजार लोकसंख्या असलेल्या गावात २१ फेब्रुवारीपासून दोन हजार नागरिकांची चाचणी करण्यात आली. ७० बाधित रुग्णांपैकी काही रुग्ण वाशिम येथील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
१२ दिवसांत शिरपुरात आढळले ७० कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:44 AM