वाशिम : अख्या महाराष्ट्राला उत्कंठा लागलेल्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम १२ सप्टेंबरला घोषीत झाला अन् जिल्ह्यातील मंदावलेल्या राजकीय घडामोडींनी गती पकडली. महायुती व आघाडी यापैकी कुणीच अद्याप उमेदवार जाहीर केले नसले तरी सर्वपक्षीय इच्छूक आपल्यालाच उमेदवारी मिळते या तोर्यात कामाला लागले आहेत. मात्र निवडणयूक आयोगाने प्रचारसाठी उपलब्ध करून दिलेल्या कमी कालावधीमुळे सद्या या संभाव्य उमेदवारांनी धडकी घेतली आहे. मतदार संघाची व्याप्ती व मतदार तथा कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे प्रचाराच्या १२ दिवसात शक्य करताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी उमेदवारांनी रणणिती आखली असल्याचे दिसून येत आहे.सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे ४५ दिवसांचा असतो; पण गणेशोत्सव, दसरा व दिवाळी या महत्त्वाच्या सणात निवडणुकीची कोणतीही प्रक्रिया येऊ नये याची काळजी घेत निवडणूणक आयोगाने विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम ४0 दिवसांवर आणला आहे. १२ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या निवडणूक कार्यक्रमांची सांगता २२ ऑक्टोंबरला होणार आहे. यामध्ये १ ऑक्टोंबर नामांकन माघारीचा अखेरचा दिवस आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या ४८ तासांपूर्वी प्रचार तोफा शांत होत असल्याने उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ १२ दिवसांचा कालावधी मिळणार आहे.जिल्ह्यात विधानसभेचे तिन मतदार संघ आहेत. त्यापैकी वाशिम मतदार संघात वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातील २६८ गावांचा समावेश आहे. कारंजा मतदार संघात कारंजा व मानोरा तालुक्यातील ३0३ तर रिसोड मतदार संघात रिसोड व मालेगाव तालुक्यातील १९८ गावे समाविष्ट आहेत. काही उमेदवारांनी यापूर्वीच तयारी केली असली तरी नवख्या उमेदवारांना मात्र मतदारांपयर्ंत पोचताना कसरत करावी लागणार आहे. प्रचारासाठी कमी कालावधी असल्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांनाही मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. प्रचाराला मिळणारा अल्प वेळ व मतदार संघाची व्याप्ती पाहता काही मतदारांनी सोशल मिडीयाचा आधार घेत प्रचाराचा धुराळा उडविण्याची तयारी केली आहे. यासाठी वॉटसअप, फेसबुकव्हाईस कॉल या हायटेकप्रणालीचा वापरही होऊ शकतो. ** उमेदवारांची कसरतच वाशिम विधानसभा मतदार संघात वाशिम सह मंगरूळपीर तालुक्यातील २६८ गावांचा समावेश आहे. येथे कॉग्रेस व भाजपमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी झालेली दिसून येत आहे. मात्र, अद्याप कुणीच उमेदवारी घोषीत केली नसल्यामुळे वातावरण शांत दिसून येत आहे.वाशिम मतदार संघाची व्याप्ती पाहता येथे १२ दिवसात प्रचार करताना सर्वपक्षीय उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच कस लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे** जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघकारंजा मतदार संघात कारंजा व मानोरा तालुक्यातील ३0३ गावांचा समोवश आहे. कांरजा तालुका विकसनशील असला तरी मानोरा तालुक्याची ओळख दुर्गम व अविकसीत म्हणूनच आहे. तालुक्यातील काही गावे अद्यापही पक्या रस्त्यांनी जोडलेली नाहीत. त्यामुळे १२ दिवसात प्रत्येक गावात पोहोचून प्रचार करणे उमेदवारांसाठी शक्य दिसत नाही. ** सेमीफायनल संपली मात्र..मालेगाव व रिसोड तालुक्याचा समावेश असलेल्या रिसोड विधानसभा मतदार संघामध्ये दोन महिन्यापूर्वीच विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली होती. सदर निवडणूक दोन्ही पक्षासाठी सेमी फायनल होती. तेव्हापासून या मतदार संघातील राजकीय वारे शांतच झाले नाहीत. त्यामुळे यावेळी उमेदवारांना पुन्हा कसरत करावी लागणार आहे. कमी कालावधी व कसरत अधिक असेच येथील चित्र राहणार असल्याचे दिसून येणार आहे. यावर उमेदवार कसे मात करतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे
प्रचाराचे ‘१२ दिवस’!
By admin | Published: September 15, 2014 12:32 AM