लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील चार पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करणे, मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरूस्ती करणे आदीसाठी १.२० कोटींच्या निधीची तरतूद असल्याने लवकरच या दवाखान्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.जिल्ह्यातील श्रेणी एकचे १७ व श्रेणी दोनचे ४१ अशा एकूण ५८ पशूवैद्यकीय दवाखाना व उपचार केंद्रांमधून जनावरांना वैद्यकीय सेवा दिली जाते. काही पशुवैद्यकीय दवाखान्यांची दुरवस्था झाली आहे. कारखेडा, काटा, मुरंबी, तोंडगाव येथील पशुदवाखान्याची इमारत मोडकळीस आल्याने नवीन इमारत बांधकामाची मागणी पुढे आली. याची दखल घेत या इमारत बांधकामासाठी निधीची मागणी शासनस्तरावर नोंदविली होती. सन २०१७-१८ या वर्षात मुरंबी व तोंडगाव येथील पशुदवाखान्यासाठी प्रत्येकी ३० लाख असा एकूण ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. सन २०१८-१९ या वर्षात कारखेडा व काटा येथील पशुदवाखान्यासाठी प्रत्येकी ३० लाख असा एकूण ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. आवश्यक ते प्रशासकीय व तांत्रिक सोपस्कार पार पडल्यानंतर बांधकामाला सुरूवात होणार आहे. बॉक्स..पशुवैद्यकीय दवाखान्यात भौतिक सुविधा उपलब्ध करणे, नवीन इमारत बांधकाम यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. चार पशुदवाखान्यांसाठी प्रत्येकी ३० लाखांचा निधी मंजूर असून, लवकरच बांधकामाला सुरूवात होईल.- विश्वनाथ सानपसभापती, कृषी व पशुसंवर्धनजिल्हा परिषद वाशिम
वाशिम जिल्ह्यातील चार पशु दवाखान्यांसाठी १.२० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2018 4:04 PM