वाशिम : पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २२ जुलैपर्यंत जिल्ह्यातील १,२३,३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. २३ जुलै अंतिम मुदत आहे.
नैसर्गिक आपत्ती, किडीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. नुकसानभरपाई मिळावी याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांना संरक्षण देण्यात येते. मात्र, जाचक अटी असल्याचे कारण समोर करून अनेक शेतकरी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवित असल्याचे यंदा दिसून येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग लाभावा याकरिता जनजागृती करण्यात आली. तथापि, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसून येते. कर्जदार शेतकऱ्यांची संख्या तर नगण्य आहे. २२ जुलैपर्यंत ५,८५८ कर्जदार आणि १,१७,४४४ बिगर कर्जदार अशा एकूण १,२३,३०२ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. विमा उतरविण्यासाठी २३ जुलै अंतिम मुदत असून त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
00000
बॉक्स
कर्जदार शेतकऱ्यांनी फिरविली पाठ
गेल्यावर्षी ८८ हजार ८५५ कर्जदार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यंदा मात्र अंतिम मुदत एका दिवसावर आलेली असतानाही केवळ ५,८५८ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. पीक विम्याचा लाभ मिळविताना होणारा त्रास आणि जाचक अटी यामुळे कर्जदार शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा उतरविण्याकडे पाठ फिरविल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
०००००००००००
शेतकऱ्यांची विमा रक्कम ८.३१
राज्य सरकारची विमा रक्कम २२.८६
केंद्र सरकारची विमा रक्कम २२.८६
0000
एकूण खातेदार संख्या २,७७,२४२
कर्जदार शेतकरी ५,८५८
बिगर कर्जदार शेतकरी १,१७,४४४
विमा संरक्षित क्षेत्र ९४,९६४ हेक्टर
00000000000