वाशिम : जिल्ह्यात मृत्यूसत्र कायम असून रविवार, २३ मे रोजी आणखी १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर २७० जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३८,२४१ वर पोहोचला आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. मृत्यूसत्रही कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. रविवारच्या अहवालानुसार कारंजा तालुक्यात सर्वाधिक ८१, तर सर्वांत कमी रुग्ण मानोरा तालुक्यात २० आढळून आले. दुसरीकडे नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येते. रविवारी नव्याने २७० रुग्ण आढळून आले, तर ६५६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्याबाहेरील १७ बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांचा आलेख खाली येत असला तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले.
००००००००००००
३३५७ सक्रिय रुग्ण
रविवारच्या अहवालानुसार, नव्याने २७० रुग्ण आढळून आले, तर ६५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ३३५७ रुग्ण सक्रिय आहेत.
000
तालुकानिहाय रुग्ण
वाशिम- ३९
मालेगाव- ५५
रिसोड- २२
मंगरुळपीर- ३६
कारंजा- ८१
मानोरा- २०