वाशिम : अवर्षण प्रवण क्षेत्र असलेल्या वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे कृषी क्षेत्रावर गदा आली आहे. त्यामुळे कृषीचे अर्थचक्र बिघडले असून जिल्ह्यात १३४ शेतकर्यांनी दोन वर्षात आ त्महत्या केल्याचे समोर आले आहे. वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुके २00५ च्या निर्णयानुसार अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात सिंचनाचा मोठा अनुशेष बाकी आहे. जवळपास २३ प्रकल्पांची सुधारीत प्रशासकिय मान्यता रखडलेली आहे, असे असतानाच गेल्या दोन ते तीन वर्षापासून वाशिम जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तीची वारंवारीता वाढली आहे. २0१३-२0१४ मध्ये जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. त्यातच २0१४ च्या उन्हाळ्य़ात जिल्ह्यातील काही भागात अभूतपूर्व गारपीट झाली होती. त्यामुळे शेतकर्यांच्या हातचे रब्बीचे पीक गेले होते. या परिस्थितीतून शेतकरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असतानाच २0१४-१५ मधील संपूर्ण खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट होते. अशा परिस्थितीत २0१५ च्या खरीप हंगामामध्येही गतवर्षीची पूनर्रावृत्ती होण्यी साधार भिती व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा मागोवा घेतला असता दोन वर्षात १३४ शेतकर्यांनी बदलत्या नैसर्गिक परिस्थिती सह अन्य काहीकारणांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी पाहता ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. त्यातच २00७ पासूनच्या मान्सूनच्या पावसाचा विचार कर ता चार वर्षे पावसाची सरासरी कमी आहे. परिणामस्वरुप शेतीमधील उत्पादकता कमी होत आहे. एखादवर्षी पीक चांगले आले तर एैन सोंगणीच्या हंगामात गारपीट, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीने शे तकर्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे एकंदरीत वाशिम जिल्ह्यातील कृषीवर आधारित अर्थचक्रच बाधीत झाले असल्याची चर्चा तज्ञांमध्ये आहे.
४३९ कुटूंबांना मदत
जिल्ह्यात गत १४ ते १५ वर्षात एक हजार १८६ शेतकर्यांनी मृत्यूस कवटाळले आहे. यापैकी प्रत्यक्षात आ त्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या कुटूंबापैकी ४३९ कुटूंबाना शासनाकडून मदत मिळाली. जवळपास ७३८ शे तकरी आत्महत्या या मदतीस पात्र ठरू शकलेल्या नाहीत तर सध्या ९ प्रकरणामध्ये चौकशी सुरू असून मृत पावलेल्या शेतकर्यांच्या या कुटूंबास मदतीची आस आहे.