लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार/मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील चिखली झोलेबाबा स्थित आदिवासी प्रकल्प विभागांतर्गत सुरु असलेल्या शासकीय माध्यमिक आo्रम शाळेतील १४ विद्यार्थ्यांना ११ ऑगस्ट रोजी विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांंना शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ अकोला ये थील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास पोटदुखी व उलटीचा त्रास सुरु झाल्याने आश्रमशाळेच्या कर्मचार्यांनी टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांंना शेलूबाजार येथील प्राथमिक केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. ८ विद्यार्थ्यांंना प्रथमोपचार करुन अकोला येथे पाठविण्यात आले. त्यानंतर पुन्हा काही विद्यार्थ्यांंना हा त्रास जाणवला. विद्यार्थ्यांंची सं ख्या वाढत गेल्याने हा प्रकार विषबाधेचा असल्याची शक्यता व र्तविण्यात आली. तातडीने विद्यार्थ्यांंवर प्राथमिक उपचार करून अकोला येथे पाठविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांंची प्रकृती स्थिर असून कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, असे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांंमध्ये कविता लोखंडे, प्रियंका धोंगडे, मीरा जामकर, प्राची लढाळ, गीता संतोष भोंडणे, स्वाती नामदेव पांडे, लक्ष्मी विजय हांडे, सुषमा आनंदा धोंगडे, मनिषा पांडे, मंगला धोंगडे, प्रीती पांडे, मोनिका सुभाष धोंगडे, विशाल पांडे, सतीश माघाडे, या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थी १४ ते १५ वयोगटातील असून, विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे तपासणीअंती स्पष्ट होणार आहे. घटनेच्या अगोदरच्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत विद्या र्थ्यांंना कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप केले होते. ११ ऑगस्ट रोजी सकाळी विद्यार्थ्यांंना नाश्ता देण्यात आला. त्यानंतर दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान वरण, भात, बटाटे असे भोजन देण्यात आल्याचे समजते.आo्रम शाळेत आरोग्याचे दृष्टीने बर्याच सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. सोयी-सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांंंचे आरोग्य धोक्यात सापडल्याची चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळाली. शासकीय आo्रम शाळेतील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची ओरड आहे.शौचालय अत्यंत घाणोरड्या अवस्थेत असून विद्यार्थ्यांंना शाळेच्या प्रांगणात उघड्यावर भोजन दिल्या जाते. एकंदरीत शाळेच्या सुविधा अत्यंत खालच्या दर्जाच्या असल्याचे समजते.
आo्रम शाळेतील विद्यार्थ्यांंंना अचानक विषबाधा झाल्यावर शेलूबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अकोला येथे ६ मुलींची सोनोग्राफी व एक्सरे करुन घेतले आणि ते नॉर्मल निघाले. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांंंवर उ पचार करुन सुट्टी देण्यात आली. - वाय.पी.इंगोले, मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आo्रम शाळा.