लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : इयत्ता दहावीच्या मराठी विषयाच्या पेपरमध्ये कॉपी करणाºया १४ विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाच्या पथकाने ३ मार्च रोजी निलंबनाची कारवाई केली. सोयजना परीक्षा केंद्रावरील १३ आणि मानोरा येथील एक अशा एकूण १४ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.इयत्ता दहावीच्या परीक्षेला ३ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. पहिला पेपर हा मराठी विषयाचा झाला असून, मानोरा तालुक्यातील काही परीक्षा केंद्रांवर कॉपी सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या पथकाला मिळाली होती. काशीबाई राठोड विद्यालय सोयजना येथील परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरविण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याने पोलीस प्रशासनालाही माहिती दिली होती. या केंद्रावर एकूण १३ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्याने त्यांना शिक्षण विभागाच्या पथकाने निलंबित केले. मानोरा येथील सुलेमानिया हायस्कूल या परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्याने त्यालाही निलंबित केले.
दहावी परीक्षा; पहिल्या दिवशी १४ कॉपीबहाद्दर विद्यार्थी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 6:45 PM