लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील पशु वैद्यकीय केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या ठिकाणी कायमस्वरुपी पशु वैद्यकीय अधिकारी नसताना आता औषधींचा तुटवडाही निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील १४ हजार पशुधनाचे आरोग्यच धोक्यात आले आहे.मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठे पशू वैद्यकीय केंद्र शिरपूर येथे आहे. या पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत १४ हजार पशुधन आहे. या सर्व पशुंची निगा राखण्यासाठी आवश्यक सुविधाच उपलब्ध नसल्याने पशूपालक अडचणीत सापडले आहेत. या ठिकाणी पशुंवर उपचार करून त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी किमान एका कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकारी आवश्यक असताना आॅक्टोबर २०१७ पासून येथील जबाबदारी प्रभारी अधिकाºयांकडे सोपविण्यात आली आहे. सद्यस्थितीत सप्ताहात मंगळवार, बुधवार, शुक्रवार असे तीन दिवस रिठद येथील पशूधन विकास अधिकारी एस. एस. गोरे हे शिरपूर पशुवैद्यकीय केंद्राला भेट देऊन पशुंवर उपचार करीत आहेत. सप्ताहातील इतर तीन दिवस मात्र, येथील पशुपालकांना खाजगी डॉक्टरांची खर्चिक सेवा घ्यावी लागत आहे. त्यातच पशुवैद्यकीय केंद्रात मागील दोन वर्षांपासून कॅल्शियम उपलब्ध नाही, तसेच गेल्या काही महिन्यांपासून जंतनाशकही औषधींचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुधनाचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
पशुवैद्यकीय केंद्रांत जंतनाशक उपलब्ध करण्याची मागणी वरिष्ठस्तरावर करण्यात आलेली असून, कॅल्शियम औषधीसाठीही पाठपुरावा करण्यात येत आहे. - एस. एस. गोरेप्रभारी पशूधन विकास अधिकारीशिरपूर जैन