वाशिम : येथील एका पानटपरीधारकाच्या घरामध्ये पोलिसांनी छापा टाकून विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधीत तंबाखू जप्त केला. या जप्त मालाची किंमत १४ हजार ३५ रूपये एवढी आहे. हा छापा पोलिसांनी शहरामधील काळे फैल येथील दीपक शर्मा यांच्या घरावर २ जुलै रोजी दुपारी १२ वाजताचे सुमारास टाकला. शहरामधील काळे फैल येथे वास्तव्यास असलेले दीपक मांगीलाल शर्मा यांचा पानटपरीचा व्यवसाय आहे. शर्मा यांनी आपल्या घरामध्ये गुटख्याचा साठा केल्याची माहिती डिटेक्शन ब्रँचला मिळाली. उपविभागीय अधिकारी अनिकेत भारती व ठाणेदार वा.तु. वांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक उदय सोयस्कर, पोलिस उपनिरिक्षक रमेश खंडारे, सिध्दार्थ राऊत, सुनील पवार, राजेश बायस्कर व हरिष दंदे यांचा समोवश असलेल्या पथकाने शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधीत तंबाखू आढळून आला. गुटखा जप्त करण्यात आल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी आर. एस. वाकोडे यांनी पंचनामा करून जप्त केलेल्या मालाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी शर्मा यांच्याविरूध्द भादंविचे कलम १८८, ३२८, २७३ व अन्न सुरक्षा व मानदे कायदा २00६ कलम २६(२) (४)शिक्षा पात्र कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोयस्कर करीत आहेत.
पानटपरीधारकाकडून १४ हजाराचा गुटखा जप्त
By admin | Published: July 03, 2014 1:51 AM